‘केंद्रामध्ये बिगरकाँग्रेस, बिगरभाजपा पक्षांच्या आघाडीचेच सरकार’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 01:58 IST2019-03-29T01:57:43+5:302019-03-29T01:58:00+5:30
'कोणत्याही मतदारसंघात एकतर्फी लढत होणार नाही'

‘केंद्रामध्ये बिगरकाँग्रेस, बिगरभाजपा पक्षांच्या आघाडीचेच सरकार’
हैदराबाद : गेल्या वेळप्रमाणे यंदा कुठेही मोदी लाट नाही. त्यामुळे केंद्रात या वेळी बिगरभाजपा व बिगरकाँग्रेसच्या आघाडीचे सरकार येईल, असे सांगतानाच, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापेक्षा पंतप्रधानपदासाठी अनेक प्रादेशिक नेते सक्षम आहेत, असा दावा केला.
ते म्हणाले की, देशातील ५४३ पैकी जेमतेम १00 मतदारसंघांमध्येच भाजपा व काँग्रेस उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. अन्य मतदारसंघांमध्ये मात्र काँग्रेस, भाजपाबरोबरच प्रादेशिक पक्षही तुल्यबळ आहेत आणि त्यामुळे प्रादेशिक पक्ष तिसरा पर्याय निर्माण करू शकतील, असा आपणास विश्वास आहे. कोणत्याही मतदारसंघात एकतर्फी लढत होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.