शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पंजाबमधील गटबाजी सोडविण्यास सोनियांचा हस्तक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 9:30 AM

तीन सदस्यीय उच्चाधिकार समिती स्थापन, चर्चेतून मार्ग काढण्यावर भर

नवी दिल्ली : पंजाबमध्येकाँग्रेसला पक्षांतर्गत गटबाजीचा सामना करावा लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींनी हस्तक्षेप केला असून तीन सदस्यीय उच्चाधिकार समिती गठित केली आहे. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना या समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले आहे. खरगे यांच्यासह पंजाबचे प्रभारी हररीश रावत आणि दिल्ली काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जे. पी. अग्रवाल यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. खरगे यांनी शनिवारी समितीची एक बैठकही घेतली. पंजाबमधील समस्या चर्चेतून सोडविण्यात येईल आणि त्यासाठी एकता हाच मंत्र असल्याचे समितीतील एका सदस्याने लोकमतला सांगितले. पुढील काही दिवसांमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि बंडखोरी करणारे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह आमदार आणि खासदारांना दिल्लीत बोलाविण्यात येणार आहे. समितीकडून त्यांची सर्व गाऱ्हाणी ऐकून घेण्यात येतील. गटबाजी शमविण्यासाठी पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद द्यावे किंवा सिद्धू यांना मंत्रिपद देऊन राज्यात क्रमांक दोनचे स्थान देण्याच्या प्रस्तावाबाबत विचारले असता तशी माहिती नसल्याचे जे. पी. अग्रवाल यांनी सांगितले. पंजाबमधील बंडखोरी शमविणे आवश्यकछत्तीसगडनंतर काँग्रेसचे दुसरे स्थिर राज्य आहे. मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे सत्तांतर झाले होते. तसेच राजस्थानातही अस्थ‍िरता निर्माण झाली आहे. मात्र, पंजाबमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे वादळ शमविणे आवश्यक आहे. ही जाणीव असल्यानेच स्वत: सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप केला आहे. अमरिंदरसिंग यांच्याविरोधात अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये मोठा गट सक्रिय झाला असून एकतेने लढल्याशिवाय निवडणुकीत यश मिळणार नाही, अशी भीती राज्यातील काँग्रेस नेत्यांना आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसPunjabपंजाब