शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसची संसदेवर धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 04:13 IST

उद्योगपतींचे कोट्यवधींचे कर्ज माफ करणारे मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचाआरोप करीत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी विरोधी घोषणा देत संसद परिसर दणाणून सोडला.

नवी दिल्ली : उद्योगपतींचे कोट्यवधींचे कर्ज माफ करणारे मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचाआरोप करीत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी विरोधी घोषणा देत संसद परिसर दणाणून सोडला. मंगळवारी संसद मार्गावर अखिल भारतीय किसान शेतमजूर काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू सह इतर राज्यातील शेतकरी ‘जबाब दो, हिसाब दो’ची घोषणा बुलंद करीत मोठ्या संख्येने सहभागी झाले.अखिल भारतीय किसान शेतमजूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, गुजरातचे प्रभारी राजीव सातव, उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिष रावत, अनुसूचित जाती सेलचे राष्टÑीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत तसेच इतर नेते उपस्थित होते. दुपारी अडीचच्या सुमारास शेतकºयांनी पटोलेंच्या नेतृत्वात संसदेला घेराव घालण्यासाठी आंदोलन स्थळावरुन मार्गक्रमण केले. आंदोलकांना रोखण्यासाठी त्यामुळे पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पटोलेंनी काही आंदोलकांसह बॅरेकेडवर चढून घोषणाबाजी के ली. पोलिसांनी नाना पटोलेंसह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मोठ्या संख्येने शेतकºयांना एकत्रित करुन वातवरण निर्मिती करण्यात काँग्रेस यशस्वी झाल्याची चर्चा होती.>मोदी हटाओ -सातवशेतकरी क र्जमाफीसंबधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रश्न विचारतात तेव्हा शेतकरी कर्जमाफी हा आमचा अजेंडा नसल्याचे उत्तर केंद्र सरकार देते. अनिल अंबानी यांच्या सोबत पॅरिसमध्ये मोदी भेट घेतात. सत्तेवर येतातच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांनी शेतकºयांना कर्जमाफी दिली. राहुल गांधींच्या सांगण्यावरुन कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्यांनी कर्जमाफी दिली. गेल्या वर्षात महाराष्ट्राने शेतकºयांचे कर्जमाफ केले. प्रत्यक्षात वर्ष उलटून केवळ ५ टक्के शेतकºयांनाच कर्जमाफी मिळाल्याचा दावा खासदार राजीव सातव यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेस