शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसचा डीएनए 'शेतकरी विरोधी', नेहरुंच्या काळात..." शिवराज सिंह चौहान यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 18:20 IST

कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गांधी घराण्यातील माजी पंतप्रधानांवर ओढले ताशेरे; म्हणाले....

नवी दिल्ली: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी (Shivraj Singh Chouhan) राज्यसभेत कृषी मंत्रालयाच्या कामकाजाची माहिती देताना काँग्रेसवर निशाणा साधला. "काँग्रेसचा डीएनए 'शेतकरी विरोधी' आहे. त्यांनी आपल्या काळात कधीही कृषी क्षेत्राला प्राधान्य दिले नाही. काँग्रेसची कार्यपद्धती सुरुवातीपासूनच चुकीची आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीत धान्य खरेदी करत नसल्याचा विरोधकांचा आरोप निराधार आहे", अशी टीका त्यांनी यावेळी केला. 

काँग्रेसच्या काळात शेतकरी...शिवराज सिंह चौहान पुढे म्हणतात, "काँग्रेसच्या राजवटीत कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि प्राधान्यक्रम चुकीचा ठेवण्यात आला. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या काळात लोकांना अमेरिकेतून आयात केलेला खराब गहू खावा लागला होता. तर, इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत सरकार शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने वसुली करायचे. यानंतर राजीव गांधी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. यूपीए सरकारचा 2004-2014 काळदेखील घोटाळ्यांनी भरलेले होता," अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

मोदी सरकारचा शेतकऱ्यांबाबत प्राधान्यक्रम"पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली कृषी क्षेत्राबाबतचे प्राधान्यक्रम बदलण्यात आले आहेत. मोदी सरकारचे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सहा प्राधान्यक्रम आहेत. पहिले- कृषी उत्पादनात वाढ, दुसरे- शेतीसाठी लागणारा खर्च कमी करणे, तिसरे- शेतकऱ्यांना योग्य भाव देणे, चौथे- नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना पुरेशी मदत करणे, पाचवे- शेतीमध्ये वैविध्य आणि मूल्यवर्धन, आणि शेवटचे सहावे- नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे," अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली.

मोदी सरकारसाठी शेतकरी देवासारखा "पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली कृषी क्षेत्राबाबतचे प्राधान्यक्रम बदलले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी रोड मॅपसह काम करते. मोदी सरकार शेतकऱ्यांना ‘व्होट बँक’ मानत नाही तर ‘देव’ मानते. मोदी सरकार एमएसपीवर माल खरेदी करुन शेतकऱ्यांना किफायतशीर भाव देण्यासाठी वचनबद्ध आहे. काँग्रेस वर्षानुवर्षे सरकारमध्ये राहिली, पण सिंचन व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. याची एक नाही, तर अनेक उदाहरणे आहेत. मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार असताना केवळ साडेसात लाख हेक्टरमध्ये सिंचन व्यवस्था होती. आम्ही ती वाढवून 47.5 लाख हेक्टर केली," असा दावाही त्यांनी यावेळी केला.

खताचे अनुदान वाढले"2013-14 मध्ये खत अनुदान 71 हजार 280 कोटी रुपये होते, ते 2023-24 मध्ये वाढून 1 लाख 95 हजार 420 कोटी रुपये झाले. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे डीएपीच्या वाढलेल्या किमतीचा बोजा आम्ही शेतकऱ्यांवर पडू दिला नाही आणि शेतकऱ्यांना स्वस्तात खत मिळावे, यासाठी 2625 कोटी रुपयांचे अतिरिक्त विशेष पॅकेज दिले. शेतकऱ्याला ₹ 2433 चा DAP ₹ 1350 ला मिळतो. सरकार शेतकऱ्याला ₹ 2366 किमतीचा युरिया ₹ 266 मध्ये देते. प्रधानमंत्री फसल विमा योजनेने शेतीची परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकली आहे," असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानcongressकाँग्रेसBJPभाजपाFarmerशेतकरी