शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

VIDEO: पुन्हा असली घोषणा दिलीस तर नदीत बुडवेन; दिग्विजय सिंहांनी वृद्धाला झापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 5:43 PM

दिग्विजय सिंहांचा हा रुद्रावतार पाहून कार्यकर्ता चांगलाच घाबरला.

भोपाळ: मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून राज्यात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारपासून एकता यात्रेला प्रारंभ केला. मात्र, ही यात्रा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ओरछा येथून ही यात्रा सुरू झाली. त्यावेळी काँग्रेसचा एक वृद्ध कार्यकर्ता 'दिग्गी राजा जिंदाबाद' अशी घोषणा देत होता. मात्र, ही घोषणा ऐकून दिग्विजय सिंह यांना प्रचंड राग आला. त्यांनी जवळ जाऊन संबंधित कार्यकर्त्याला चांगलेच झापले. पुन्हा अशी घोषणा दिलीस तर तुला इथेच नदीत बुडवेन, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले. दिग्विजय सिंहांचा हा रुद्रावतार पाहून कार्यकर्ता चांगलाच घाबरला. त्याने कान पकडून दिग्विजय सिंह यांची माफी मागितली. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. वृद्ध व्यक्तीला अशी वागणूक दिल्यामुळे अनेकजण दिग्विजय सिंह यांच्यावर टीकाही करत आहेत. अलीकडे काँग्रेसने अंगिकारलेल्या सॉफ्ट हिंदुत्त्वाच्या रणनीतीचा भाग म्हणून दिग्विजय सिंह यांच्या एकता यात्रेची सुरुवात ओरछा येथील राम मंदिरापासून झाल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. मध्य प्रदेशात 2003 साली उमा भारती यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपाने काँग्रेसचा दारूण पराभव केला होता. त्यावेळी दिग्विजय सिंह यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दिग्विजय सिंह यांनी एकही निवडणूक लढवली नव्हती. मात्र, या काळात काँग्रेसने दिग्विजय सिंह यांना राज्यसभेवर पाठवून महासचिवपदाची जबाबदारी दिली होती. मात्र, आता दिग्विजय सिंह पुन्हा एकदा मध्य प्रदेशच्या राजकारणात सक्रीय होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपाचे नेते सतर्क झाले असून त्यांनी दिग्विजय यांना लक्ष्य करण्याची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. 

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेस