शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

“राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ‘भारत जोडो’ यात्रा काढावी”; CWC बैठकीत खरगेंचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 19:30 IST

Congress CWC Meet: इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर आता काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत झाली.

Congress CWC Meet ( Marathi News ): संसद सुरक्षा त्रुटी, खासदारांचे निलंबन यांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. गृहमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही सभागृहात येऊन निवेदन, स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचा आकडा आता १४६ वर गेला आहे. इंडिया आघाडीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर आता काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी समितीची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधी यांना पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा काढण्याचा सल्ला दिला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा झालेला पराभव, खासदारांचे निलंबन यांसह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत, पक्षाचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा काढावी. दुसरी भारत जोडो यात्रा पूर्वेकडून पश्चिमकडे असावी, असा सल्ला मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला आहे. काँग्रेस नेत्यांची तशी मागणी असल्याचे खरगे यांनी नमूद केले. तसेच अंतिम निर्णय राहुल गांधी यांचा असेल, असेही यावेळी स्पष्ट केले.

निवडणुकांचे निकाल निराशाजनक आहेत

नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल निराशाजनक आहेत. आम्ही आमच्या चुकांमधून शिकलो आहोत. त्यांची पुनरावृत्ती होणार नाही, यावर भर दिला जाणार आहे. लोकसभा निवडणूक फार दूर नाही, त्यामुळे आपण सर्वांनी आपापल्या  कामांत व्यस्त झाले पाहिजे, अशा सूचना खरगे यांनी काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच भविष्यातील राजकारणावर परिणाम करणारे प्रश्न आपण विसरू नये. जातिनिहाय जनगणना आणि महिला आरक्षण हे महत्त्वाचे मुद्दे असतील. महिला आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी आणि महिलांना आरक्षणाच्या कक्षेत आणावे, अशी आमची मागणी आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ठोस रणनीती आखावी लागेल आणि समविचारी पक्षांसोबत काम करून जास्तीत जास्त जागा जिंकाव्या लागतील, असे खरगे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल करणे आणि विरोधी खासदारांच्या निलंबनावरून झालेल्या वादाचा संदर्भ देत खरगे म्हणाले की, खासदारांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या घटनात्मक पदांवर असलेले लोक पक्षीय राजकारणाचा भाग म्हणून असे करत आहेत. जात, क्षेत्र आणि व्यवसायाची ढाल करून राजकारण करत आहेत. आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत, असा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा