शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

'अबकी बार महंगाई पर वार' म्हणणाऱ्या मोदींचे वाढत्या महागाईवर मौन, काँग्रेसची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 12:28 IST

महागाईच्या प्रश्नावर मोदींच्या नेतृत्वातील भाजपा सरकार नाकर्ते झाले आहे

नवी दिल्ली  - एकीकडे देश आर्थिक संकटात सापडलेला असतानाच गेल्या काही काळात महागाईनेही उसळी घेतली आहे. अन्नधान्यापासून दैनंदिन वापरातील वस्तू मोठ्या प्रमाणावर महागल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान, वाढत्या महागाईच्या मुद्यावरून आज काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजपा सरकारवर घणाघाती टीका केली आहे. काही वर्षांपूर्वी 'अबकी बार महंगाई पर वार' म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाढत्या महागाईच्या प्रश्नावर गप्प बसले आहेत, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. महागाईच्या प्रश्नावर मोदींच्या नेतृत्वातील भाजपा सरकार नाकर्ते झाले आहे. देशातील जनता महागाईने होरपळत असताना ना मोदी काही उत्तर देत आहेत, ना भाजपाकडून काही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

''आतातर देशात देशात शाकाहारी होणेसुद्धा अपराध बनले आहे. भाजीपाला, खाद्यपदार्थांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भात, गहू, साखर, भाजीपाला, खाद्यतेल असे सर्वच पदार्थ महागले आहेत. 2014 मध्ये कांद्याचा दर 8 रुपये प्रतिकिलो होता तो आज 85 रुपये झाला आहे. टोमॅटोचा दर 14 रुपये किलो होता, तो आज 39 रुपये किलो झाला आहे. 2014 मध्ये बटाटे 8 रुपये किलो होते ते 29 रुपये किलो झाले आहेत. लसुणीचा दर 290 रुपये प्रतिकिलो झाला आहेत,'' असे सांगत सुरजेवाला यांनी महागाईची आकडेवारीच माध्यमांसमोर मांडली. ॉ

'सरकारने जनतेचा खिसा कापून पोटावर लाथ मारली', महागाईवरून प्रियंका गांधींचा हल्लाबोल

महागाईने केला कहर; 'कांद्या'मुळे गाठला साडेपाच वर्षांतील उच्चांकी दर

महागाई आणखी वाढण्याची शक्यता;  महसूल वाढविण्याची केंद्राची तयारी

दरम्यान, देशातील किरकोळ महागाई दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. ही वाढ गेल्या साडेपाच वर्षांतील उच्चांकी आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्याआधी जवळपास तेवढीच महागाई होती. जुलै 2014 मध्ये महागाई दर 7.39% होता. गेल्या नोव्हेंबरमध्ये 5.54 टक्के महागाई दर होता. सांख्य़िकी कार्यालयामध्ये सोमवारी आकडेवारी जाहीर केली. भाज्यांचे वाढलेले दर विशेषकरून डिसेंबरमध्ये कांद्याच्या दराने गाठलेला 200 चा आकडा महागाई दरावर प्रभाव टाकणारा ठरला आहे. डिसेंबरमध्ये भाज्यांचे दर 60.5 टक्के महाग झाले होते. खाद्यपदार्थांचा महागाई दर वाढून 14.12 टक्के झाला आहे. नोव्हेंबरमध्ये हा दर 10.01 टक्के होता. 

टॅग्स :InflationमहागाईCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस