शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

येडियुरप्पांकडून भाजपा नेत्यांना 1800 कोटींची लाच, काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 09:06 IST

कर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांना तब्बल 1800 कोटींची लाच दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

ठळक मुद्देकर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांना तब्बल 1800 कोटींची लाच दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने माध्यमामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचा हवाला देऊन हा गंभीर आरोप केला आहे.नवनियुक्त लोकपालांकडे सोपवण्यासाठी हे आदर्श प्रकरण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत काँग्रेसने या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी केली.

नवी दिल्ली - कर्नाटकातीलभाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांना तब्बल 1800 कोटींची लाच दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने माध्यमामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचा हवाला देऊन हा गंभीर आरोप केला आहे. नवनियुक्त लोकपालांकडे सोपवण्यासाठी हे आदर्श प्रकरण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत काँग्रेसने या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी केली आहे. 

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी येडियुरप्पा यांच्या डायरीत 1800 कोटींच्या वाटपाचा तपशील आहे याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समोर येऊन स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे ही डायरी आयकर विभागाच्या ताब्यात 2017 पासून असूनही पंतप्रधान मोदी यांनी त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले नसल्याचा आरोपही सुरजेवाला यांनी केला आहे. काँग्रेसने केलेल्या या आरोपांनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाचे सारे चौकीदार चोर असल्याचा आरोप ट्वीटरद्वारे केला. भाजपाने हे आरोप फेटाळून लावले असून, येडियुरप्पा यांनी हा दस्तावेज बनावट असल्याचा दावा केला आहे. एका मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखाच्या आधारे पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसने हे आरोप केले आहेत. केंद्रीय विधी व न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवकुमार यांच्या घरी घातलेल्या धाडीत आयकर अधिकाऱ्यांना डायरीच्या झेरॉक्स मिळाल्या होत्या, असा दावा केला आहे. 

'कर्नाटकात लोकसभेच्या 22 जागा जिंकल्या तर 24 तासांच्या आत भाजपाचे सरकार'कर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी काही दिवसांपूर्वी कर्नाटकात लोकसभेच्या 22 जागा जिंकल्यास भाजपाचे सरकार 24 तासांच्या आत सत्तेवर येईल असा दावा केला होता. यारागट्टी गावात एका सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी येडियुरप्पा यांनी असं म्हटलं होतं. येडियुरप्पा यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईचा फायदा पक्षाला होईल असे म्हटले होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केल्यानंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनाची लाट आली आहे. याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत दिसून येणार आहे. तसेच या कारवाईमुळे कर्नाटकात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 22 हून अधिक जागा जिंकण्यास मदत होईल, असे बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाKarnatakकर्नाटक