शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे ११ राज्यांमधील ८० जागांवर मंथन; महाराष्ट्रावर चर्चा नाही; आज जाहीर होणार तिसरी यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 13:50 IST

आतापर्यंत काँग्रेसने लोकसभेच्या ८२ जागांची घोषणा केली आहे.

आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत मंगळवारी तिसरी बैठक झाली. या बैठकीत ११ राज्यांतील ८० जागांवर चर्चा झाली. या जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. काँग्रेसकडून बुधवारी या ८० जागांची घोषणा होऊ शकते. आतापर्यंत काँग्रेसने लोकसभेच्या ८२ जागांची घोषणा केली आहे.

आजच्या बैठकीत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील लोकसभेच्या जागांबाबत चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरातही दिल्लीत दाखल झाले होते. मात्र, आजच्या बैठकीत महाराष्ट्रावर कोणतीही चर्चा झाली नाही. पुढील बैठकीत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पाच जागांचा समावेश करण्यात येणार आहे.

देशाला बदल हवा आहे आणि या लोकसभा निवडणुकीत भाजप सरकारची ‘गॅरंटी’ ही २००४ मधील ‘इंडिया शायनिंग’सारखीच होईल. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा.- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

  • काँग्रेसच्या न्यायपत्रात नेमके आहे काय?

- ‘युवा न्याय’ - ३० लाख सरकारी नोकऱ्या व तरुणांना एक वर्षासाठी प्रशिक्षणार्थी कार्यक्रमांतर्गत १ लाख रुपये. - ‘सामायिक न्याय’ - जातनिहाय जनगणना करण्याची तसेच आरक्षणाची ५० टक्के मर्यादा काढून टाकण्याची ‘हमी’.- ‘शेतकरी न्याय’ - किमान आधारभूत किमतीला कायदेशीर दर्जा, कर्जमाफी आयोगाची स्थापना आणि जीएसटीमुक्त शेती. - ‘कामगार न्याय’ - कामगारांना आरोग्याचा अधिकार, किमान वेतन ४०० रुपये प्रतिदिन आणि शहरी रोजगार हमी.- ‘महिला न्याय’ - गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला एक लाख रुपये देणार.

जाहीरनामा मंजुरीचे अधिकार

काँग्रेस कार्यकारिणीने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा मंजूर करण्याचे अधिकार  दिले. हा जाहीरनामा नसून ‘न्याय पत्र’ असेल, असेही पक्षाने सांगितले. भागीदारी न्याय, शेतकरी न्याय, महिला न्याय, कामगार न्याय आणि युवा न्याय यांचा समावेश आहे. ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काँग्रेसचा जाहीरनामा तयार केला आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४