शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

शशी थरूर तिरुअनंतपुरममधून निवडणूक लढवणार; तिकीट मिळाल्यावर व्यक्त केला आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 23:00 IST

Shashi Tharoor to Contest From Thiruvananthapuram : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि खासदार शशी थरूर यांना पुन्हा एकदा केरळमधील तिरुवनंतपुरममधून तिकीट मिळाले आहे.

Shashi Tharoor to Contest From Thiruvananthapuram : नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने शुक्रवारी (८ मार्च) लोकसभा निवडणुकीसाठी ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते आणि खासदार शशी थरूर यांना पुन्हा एकदा केरळमधील तिरुवनंतपुरममधून तिकीट मिळाले आहे. त्यामुळे शशी थरूर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसने उमेदवार बनवल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 

शशी थरूर यांनी एक व्हिडिओद्वारे म्हटले आहे की, "काँग्रेस पक्षाने मला माझी जागा वाचवण्याची संधी दिली, यामुळे मला सन्मान आणि नम्र असल्याचे वाटत आहे. मी निष्पक्ष आणि प्रभावी लढतीसाठी उत्सुक आहे. १५ वर्षांच्या राजकारणात मला नकारात्मक प्रचारासाठी एक दिवसही घालवण्याची गरज पडली नाही." तसेच, इतर पक्षांच्या उमेदवारांप्रती असलेल्या राजकीय शिष्टाचाराबद्दलही त्यांनी भाष्य केले. राजकीय लढा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

२००९ पासून सतत विजयी शशी थरूर २००९ पासून तिरुअनंतपुरममधून सतत विजयी होत आहेत. अशा स्थितीत त्यांना पुन्हा एकदा या जागेवरून उमेदवारी देणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. दरम्यान, इस्रायल, हमास आणि इतर अनेक मुद्द्यांवर शशी थरूर यांनी अशी विधाने केली होती, त्यामुळे पक्ष अडचणीत आला होता. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत जोरदार चर्चा रंगली होती.

केरळमधील १६ उमेदवार घोषितशुक्रवारी जाहीर झालेल्या काँग्रेसच्या पहिल्या यादीत सर्वाधिक १६ उमेदवार केरळमधील आहेत. पक्षाने केरळमध्ये आपले सर्व १५ विद्यमान लोकसभा सदस्य पुन्हा उभे केले आहेत. केरळमध्ये लोकसभेच्या एकूण २० जागांपैकी १६ जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार आहे. मित्रपक्ष चार जागांवर निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, काँग्रेसने छत्तीसगडमधील सहा, कर्नाटकातील सात, तेलंगणातील चार, मेघालयातील दोन आणि लक्षद्वीप, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी एका जागेसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४