शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

...तर काँग्रेसला केवळ एवढ्याच जागांवर लढता येणार, या राज्यांवर पाणी सोडावं लागणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 13:24 IST

Congress: मोदी आणि भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी विरोधी पक्षांचं ऐक्य घडवून आणून त्या माध्यमातून सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र हे विरोधी पक्षाचं ऐक्य वास्तवात आल्यास त्यासाठी काँग्रेसला मोठा त्याग करावा लागण्याची शक्यता आहे.

गेल्या ९ वर्षांपासून केंद्रातील सत्तेपासून बाहेर असलेला काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. काँग्रेसच्या या सत्तामार्गात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे मोदी आणि भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी विरोधी पक्षांचं ऐक्य घडवून आणून त्या माध्यमातून सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र हे विरोधी पक्षाचं ऐक्य वास्तवात आल्यास त्यासाठी काँग्रेसला मोठा त्याग करावा लागण्याची शक्यता आहे. कारण मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्ष एकत्र आल्यास काँग्रेसला लोकसभेच्या अनेक राज्यांत आपले उमेदवार उतरवता येणार नाहीत, तसेच अनेक राज्यांमधून पूर्णपणे माघार घ्यावी लागेल.

देशातील १० राज्ये अशी आहेत जिथे काँग्रेसची सत्ता नाही आहे. यामध्ये दिल्ली, पंजाब, केरळसारखी राज्ये आहेत. उत्तर प्रदेशमधील ८० जागांवर सपा आणि आरएलडी, बिहारमधील ४० जागंवर जेडीयू आणि आरजेडी, महाराष्ट्रातील ४८ जागांवर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, पश्चिम बंगालमधील ४२ जागांवर तृणमूल काँग्रेस, तामिळनाडूतील ३९ जागांवर डीएमके, केरळच्या २० जागांवर सीपीआय (एम), जम्मू काश्मीरच्या सहा जागांवर पीडीपी आणि नॅशनल कॉन्फ्रन्स, झारखंडच्या १४ जागांवर झारखंड मुक्ती मोर्चा, पंजाबच्या १३ जागांवर आणि दिल्लीच्या ७ जागांवर आपकडून अधिकाधिकी दावेदारी केली जाईल. या राज्यांमध्ये लोकसभेच्या तब्बल ३०९ जागा आहेत. 

त्यामुळे स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसकडे केवळ २३३ जागाच शिल्लक राहतील. त्यामध्ये काँग्रेस अरुणाचल प्रदेशमधील २, आसाममधील १४, आंद्र प्रदेशमधील २५, तेलंगाणामधील १७, चंडिगडमधील १, छत्तीसगडमधील ११, दादरा नगर हवेलीतील १, दमण दिवची १, गोव्याच्या २, गुजरातच्या २६, हरियाणातील १०, हिमाचल प्रदेशमधील ४ कर्नाटकमधील २८, मध्य प्रदेशमधील २९, मणिपूरच्या २, मेघालयच्या २, मिझोराममधील १, नागालँडमधील १, ओडिशामधील २१, पाँडेचेरीतील १, राजस्थानमधील २५, सिक्कीममधील १, त्रिपुरामधील २ आणि उत्तराखंडमधील ५ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवू शकतो.  

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेlok sabhaलोकसभा