शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी प्रकरणात समोर आले आणखी एक नाव, सोनम-राजशी आहे थेट कनेक्शन! कोण आहे 'हा' व्यक्ती? 
2
Raja Raghuvanshi Murder: कोण आहे अल्बर्ट पीडी? ज्याच्या एका जबाबामुळे सोनम रघुवंशीचा खरा चेहरा जगासमोर आला
3
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
4
'काम करु नका, मुले जन्माला घाला'! लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाने काढले फर्मान
5
Sonam Raghuvanshi : "मी कोणाशीही लग्न केलं तरी मी तुझीच गर्लफ्रेंड...", सोनमसमोर स्टेजवर ढसाढसा रडला राज
6
डिलिव्हरी फ्री, पॅकेजिंग फ्री फक्त... रॅपिडोची फूड डिलिव्हरी बाजारात एन्ट्री! झोमॅटो-स्विगी टेन्शनमध्ये?
7
Vastu Tips: आर्थिक संकट असो वा जुना आजार; झोपण्यापूर्वी 'या' उपायाने मिळेल समाधान!
8
राजा रघुवंशी हत्याकांडावर सीमा हैदरच्या वकिलांचं मोठं विधान, म्हणाले - 'इस्लाम धर्मात...!'
9
महाराष्ट्रात मद्याच्या किंमतीत वाढ; दारूचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स आपटले
10
सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींना भेट दिली दोन खास पुस्तकं, काय आहेत नावं?
11
Video: 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान दाखवले मोठे शौर्य; इंडिगोच्या विमानात BSF जवानाचा सन्मान
12
Covid Cases: कोरोना वाढतोय! पंतप्रधान मोदींना भेटण्याआधी मंत्री, नेत्यांना RT-PCR चाचणी सक्तीची
13
मुलाचा मृत्यू झाल्यावर वडिलांनी मृतदेहासोबत पुरली बाईक; मन हेलावून टाकणारी घटना
14
नारकरांच्या लेकाची गर्लफ्रेंडसोबत डेट, बांद्रामध्ये मारला फेरफटका; प्रेमाने तिला म्हणाला...
15
ऐरोली स्थानकाजवळ चायनीजच्या गाडीत सिलिंडरचा स्फोट, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर!
16
...तर प्रवाशांनी खच्चून भरलेली ट्रेन दगड, मातीत गाडली जाईल
17
५ मे रोजी लग्न, २५ ला हनिमून, २९ ला अपघात... बेपत्ता कपलचा गेल्या १३ दिवसांपासून शोध सुरू
18
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
19
Astrology: प्रेम होणे, प्रेमभंग होणे आणि प्रेमविवाह यशस्वी होणे याचेही पत्रिकेत विशिष्ट योग असतात!
20
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...

'है कथा संग्राम की, स्वार्थ की परमार्थ की...' महाभारताच्या गाण्यातून काँग्रेसची भाजपवर जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 13:44 IST

महाभारताचे गाणे लावून गांधी-नेहरुंच्या काँग्रेसपासून आजच्या काँग्रेसपर्यंतचा प्रवास व्हिडिओत दाखवला आहे.

Congress BJP: 'है कथा संग्राम की, विश्व के कल्याण की, धर्म अधर्म, आदि अनंत, सत्य असत्य, क्लेश कलंक स्वार्थ की कथा परमार्थ की, शक्ति है भक्ति है, जन्मों की मुक्ति है, जीवन का ये संपूर्ण सार है… नवीन महाभारताचे हे थीम सॉन्ग सध्या खूप चर्चेचा विषय ठरत आहे. मोबाईलच्या रिंग टोनपासून ते कॉलर टोनपर्यंत, अनेकांनी या गाण्याला सेट केले आहे. या गाण्यातील प्रत्येक शब्द महाभारताची कथा सांगतो. यातच आता काँग्रेस नेते या गाण्यापासून बनलेला एक व्हिडीओ शेअर करत आहेत. 

व्हिडिओच्या बॅकग्राउंडला महाभारताचे हे गाणे असून गांधी-नेहरुंच्या काँग्रेसपासून ते आजच्या काँग्रेसपर्यंतचा प्रवास या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे. एवढंच नाही तर या व्हिडिओतून काँग्रेस आणि भाजपमधील वैचारिक लढाईदेखील दाखवण्यात आली आहे. या गाण्यात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, मनमोहन सिंग, नथुराम गोडसे, वीर सावरकर, पीएम मोदी आणि अमित शहांचाही उल्लेख आहे. गाण्यातील प्रत्येक शब्दाला वेगळा फोटो लावला आहे.

व्हिडिओत काय...?

गाण्याची सुरुवात बीआर चोप्रांच्या महाभारतातील एका दृश्याने होते. यात शिखरावर पांडवांसह भगवान श्रीकृष्ण विराजमान आहेत. दुसऱ्या फोटोत द्रौपदीचे अपहरण आणि तिसऱ्यात धृतराष्ट्र, दुर्योधन आणि इतर भाऊ पितामह भीष्मांसोबत उभे आहेत. पुढच्या फोटोत वासुदेवाचे विशाल रूप दाखवण्यात येते. यानंतर राजकीय महाभारत सुरू होते. यानंतर राजकीय फोटो सुरु होतात.

गाण्याचे बोल आणि नेत्याचा फोटोगाण्यात जिथे धर्माचे किंवा सत्याचे नाव येते, तिथे गांधींचा फोटो दाखवलाय, तर अधर्म किंवा असत्याचा उल्लेख आहे, तिथे नथुराम गोडसेसह इतर भाजप नेत्यांचे फोटो आहेत. काँग्रेसने गाण्यातून भाजपच्या विचारधारेवर हल्ला चढवला आहे. काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाMahabharatमहाभारतlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक