शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

राहुल राम, तर मोदी रावण; काँग्रेसच्या पोस्टरनं मध्य प्रदेशात रामायण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 10:41 IST

काँग्रेसच्या पोस्टरवर मोदींसह भाजपाच्या बड्या नेत्यांचे आणि मंत्र्यांचे चेहरे

भोपाळ: काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वारंवार राफेल विमान खरेदी प्रकरणावरुन निशाणा साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशात काँग्रेसनं लावलेल्या पोस्टरनं खळबळ माजली आहे. या पोस्टरवर नरेंद्र मोदींना रावणाच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. तर राहुल गांधींना रामाच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. राहुल गांधी मोदींच्या दिशेनं बाण मारण्यास सज्ज झाल्याचं या पोस्टरवर दिसत आहे. काल राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांनी एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले चढवले. यानंतर मध्य प्रदेशात आज काँग्रेसनं पोस्टर लावून मोदी आणि भाजपावर निशाणा साधला. राफेल डीलवरुन राहुल गांधी पंतप्रधानांवर सतत टीकास्त्र सोडत असताना आता मध्य प्रदेश काँग्रेसनं याचवरुन पोस्टरवॉर सुरू केलं आहे. काँग्रेसच्या पोस्टरमध्ये मोदींना रावणाच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. पोस्टरवर मोदींची दहा तोंडं दिसत आहेत. यावर भाजपा अध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे चेहरे पोस्टरवर दिसत आहेत. 'चोरो तुम्हारी खैर नहीं, हम राम भक्त है. चोरों के अलावा किसी से बैर नहीं', असा मजकूर या पोस्टरवर आहे. याशिवाय एका राफेल विमानासह 'चौकीदार ही चोर है' ही राहुल गांधींनी दिलेली घोषणादेखील पोस्टरवर आहे. याआधीही अनेकदा राहुल यांना काँग्रेसनं पोस्टरवर राम भक्ताच्या रुपात दाखवलं आहे. मात्र या पोस्टरमधून राम मंदिराच्या मुद्द्याला स्पर्श करत काँग्रेसनं राफेल डीलवरुनही भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता या पोस्टरवर भाजपाकडून काय प्रतिक्रिया येणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.  

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाNitin Gadkariनितीन गडकरीpiyush goyalपीयुष गोयलyogi adityanathयोगी आदित्यनाथArun Jaitleyअरूण जेटलीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानAmit Shahअमित शहाRajnath Singhराजनाथ सिंह