शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

राहुल यांच्या ‘अझहर जी’वर काँग्रेसनं करून दिली रविशंकर यांच्या 'हाफिज जी'ची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 10:22 IST

पुलवामा दहशतवाही दल्ला आणि बालाकोटमध्ये एअर स्ट्राइकनंतर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय नेते उचलून धरत आहेत.

नवी दिल्ली- पुलवामा दहशतवाही दल्ला आणि बालाकोटमध्ये एअर स्ट्राइकनंतर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय नेते उचलून धरत आहेत. याच मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपाला घेरण्याच्या नादात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला 'जी' असं संबोधलं. त्यानंतर भाजपानं हा मुद्दा उचलून धरत राहुल गांधींवर निशाणा साधला. परंतु आता काँग्रेसनंही भाजपाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदीनं यांनी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ज्यात मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदला रविशंकर प्रसाद 'हाफिजजी' असं म्हणत असल्याचं पाहायला मिळतंय.प्रियंका चतुर्वेदी ट्विटमध्ये लिहितात, मला आशा आहे की भाजपाच्या नव्या वेबसाइटवर या व्हिडीओला योग्य जागा मिळेल. भाजपा नेतृत्वाचंही हाफिज सईदला एक प्रकारे समर्थन होतं. भाजपानंच वेद प्रकाश वैदिक यांना हाफिज सईदची गळाभेट घेण्यासाठी पाठवलं होतं. तर प्रियंका यांनी दुसऱ्या एका शेअर केलेल्या फोटोमध्येही अजित डोवाल मसूद अझहरला सोडायला जात असतानाचं चित्र दाखवलं आहे.भाजपावर टीका करण्याच्या नादात राहुल गांधींनी कुख्यात दहशतवादी आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टर माइंड मसूद अझहर याचा उल्लेख मसूद अझहरजी असा केला. त्यामुळे भाजपावर निशाणा साधण्याच्या भरात राहुल गांधी स्वत:च अडचणीत सापडल्याची चर्चा सुरू झाली आहे.राहुल गांधी यांनी काल दिल्लीमध्ये काँग्रेसच्या बुथ कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. तसेच भाजपाच्या याआधीच्या सरकारनेच मसूद अझहरला सोडल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. मात्र यादरम्यान भाजपावर टीका करण्याचा भारात राहुल गांधी यांनी मसूद अजहर याचा उल्लेख मसूद अझहरजी असा केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस