शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडून ५ राज्यांसाठी पक्ष निरीक्षक नियुक्त; रणदीप सुरजेवालांकडे मध्य प्रदेश तर मधुसूदन मिस्त्रींकडे राजस्थानची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 23:07 IST

पाच राज्यांमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसने सोमवारी निवडणुका असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम राज्यासाठी वरिष्ठ निरीक्षक आणि निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या नियुक्त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. या पाच राज्यांमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जारी केलेल्या पत्रानुसार, पक्षाने मधुसूदन मिस्त्री आणि शशिकांत सेंथिल यांची राजस्थानसाठी वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. याचबरोबर मध्य प्रदेशसाठी रणदीप सिंग सुरजेवाला यांना वरिष्ठ निरीक्षक आणि चंद्रकांत हंडोरे यांना निरीक्षक बनवण्यात आले आहे. छत्तीसगडमध्ये प्रीतम सिंग वरिष्ठ निरीक्षक आणि मीनाक्षी नटराजन निरीक्षक म्हणून दिसणार आहेत.

याचबरोबर, तेलंगणामध्ये दीपा दासमुन्शी यांची वरिष्ठ निरीक्षक आणि श्रीवेल्ला प्रसाद यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, ४० विधानसभेच्या जागा असलेल्या मिझोरमसाठी काँग्रेसने सचिन राव यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे राज्य लहान आहे, त्यामुळे त्यासाठी केवळ एका निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

निरीक्षकाची भूमिका महत्त्वाची राजकीय पक्षांमध्ये निरीक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तिकीट वाटपापासून ते निवडणुकीची रणनीती बनवण्यापर्यंत निरीक्षक काम करतात. यावरून निवडणुकीतील निरीक्षकांच्या भूमिकेचा अंदाज लावता येतो. यासोबतच निवडणुकीच्या काळात पक्ष एकसंध ठेवायचा, नेत्यांची नाराजी दूर करायची आणि सर्वांचे म्हणणे ऐकून पक्षाला विजय मिळवून देण्याचाही निरीक्षकांचा प्रयत्न असतो.

कोणत्या राज्यात कोणाचे सरकार?विधानसभा निवडणुका होणाऱ्या पाच राज्यांबद्दल बोलायचे झाले तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. सध्या राजस्थानमध्ये अशोक गेहलोत मुख्यमंत्री आहेत आणि छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल मुख्यमंत्री आहेत. तर मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आहे आणि मिझोराममध्ये एनडीए आघाडीचे सरकार आहे. मध्य प्रदेशात २३० विधानसभा जागांसह शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री आहेत आणि मिझोराममध्ये कोनराड संगमा मुख्यमंत्री आहेत. दुसरीकडे, तेलंगणात बीआरएस पक्षाची सत्ता आहे आणि के चंद्रशेखर राव मुख्यमंत्री आहेत. 

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthanराजस्थान