शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

" जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आणि सहकाऱ्यांना ३७० जन्म घ्यावे लागतील"

By बाळकृष्ण परब | Published: October 17, 2020 1:15 PM

Article 370 News : ३७० हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी करणाऱ्या पी. चिदंबरम यांच्यावर भाजपाचे नेते मुख्यात अब्बास नक्वी यांनी जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देकलम ३७० रद्द झाल्याने जम्मू-काश्मीर, लेह, कारगिलमधील ३७० समस्या सुटण्याचा मार्ग झाला मोकळा कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील जनतेमध्ये सकारात्मक वातावरण काँग्रेस आणि त्यांचे बगलबच्चे असलेल्या मित्रांना कलम ३७० पुन्हा लागू करता येईल, असे वाटत असेल. तर ते मुंगेरीलालचे स्वप्न ठरेल

नवी दिल्ली - माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी काल कलम ३७० बाबत केलेल्या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. कलम ३७० हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी करणाऱ्या पी. चिदंबरम यांच्यावर भाजपाचे नेते मुख्यात अब्बास नक्वी यांनी जोरदार टीका केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ३७० जन्म घ्यावे लागतील, असा टोला मुख्यार अब्बास नक्वी यांनी लगावला आहे.पी. चिदंबरम यांनी कलम ३७० बाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ३७० जन्म घ्यावे लागतील. कलम ३७० रद्द झाल्याने जम्मू-काश्मीर, लेह, कारगिलमधील ३७० समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील जनतेमध्ये सकारात्मक वातावरण आहे. मत्र असे असतानाही काँग्रेस आणि त्यांचे बगलबच्चे असलेल्या मित्रांना कलम ३७० पुन्हा लागू करता येईल, असे वाटत असेल. तर ते मुंगेरीलालचे स्वप्न ठरेल, असा चिमटाही नक्वी यांनी काढला.जम्म-काश्मीरमधील मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांनी गुरुवारी एका बैठकीचे आयोजन करत जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती. तसेच या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी काश्मिरी पक्षांनी एका आघाडीची घोषणा केली आहे. ही आघाडी कलम ३७० च्या मागणीसांठी संबंधित सर्व पक्षांशी चर्चा सुरू करणार असल्याचे म्हटले होते. यासाठीची बैठक नॅशनल कॉन्फ्रन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला पीडीपीच्या अध्यक्षा महेबुबा मुफ्ती, पीपल्स कॉन्फ्रन्सचे सज्जाद लोन, पीपल्स मुव्हमेंटचे नेते जावेद मीर आणि माकपाचे नेते मोहम्मद युसूप तारिगामी हे उपस्थित होते. दरम्यान, या आघाडीला पी. चिदंबरम यांना पाठिंबा देत कलम ३७० रद्द करण्याची मागणी केली होती.कलम ३७०बाबत काय म्हणाले होते पी. चिदंबरमकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यात यावे, असे विधान केले आहे. तसेच या मागणीसाठी काश्मिरी पक्षांनी केलेल्या आघाडीलाही पाठिंबा दिला आहे. पी. चिदंबरम यांनी सांगितले की, केंद्र सरकारने कलम ३७० हटवण्याचा निर्णय मागे घेतला पाहिजे. तसेच जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांचे अधिकार परत मिळवण्यासाठी मुख्य प्रवाहातील पक्षांनी घटनात्मक लढाई लढण्यासाठी एकत्र येण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे देशातील नागरिकांनी स्वागत केले पाहिजे. केंद्र सरकारने मुख्य प्रवाहातील पक्ष आणि आणि जम्मू काश्मीरमधील जनतेकडे ते देशविरोधी असल्याच्या नजरेने पाहणे बंद केले पाहिजे. काँग्रेस जम्मू काश्मीरमील जनतेचे अधिकार परत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी मनमानी पद्धतीने घेतलेला असंवैधानिक निर्णय मागे घेतला पाहिजे, असे चिदंबरम म्हणाले.

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण