शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

मोदींना औरंगजेबाप्रमाणेच जवळच्या माणसांची भीती वाटतेय- काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 22:08 IST

काँग्रेसकडून पुन्हा एकदा मोदींची तुलना औरंगजेबाशी

नवी दिल्ली: काँग्रेसनं पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना मुघल बादशहा औरंगजेबाशी केली आहे. पंतप्रधान मोदींना आता औरंगजेबाप्रमाणे असुरक्षित वाटू लागलं आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी मोदींवर थेट शरसंधान साधलं आहे. औरंगजेबच्या आयुष्यातील एक काळ असा होता की, त्याला जवळच्या व्यक्तींना भेटायचीदेखील भीती वाटायची, असं चतुर्वेदी म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका असल्याचं वृत्त काल प्रसिद्ध झालं. त्यामुळे यापुढे मोदींच्या भेटीसाठी जाणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांना एसपीजी कमांडोंची परवानगी आवश्यक असेल. मोदींच्या जीवाला धोका असल्यानं त्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावरुन काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी मोदींवर निशाणा साधला. 'आता मोदींचे मंत्री आणि अधिकारी त्यांना एसपीजी कमांडोंच्या परवानगीशिवाय भेटू शकणार नाहीत. हे ऐकून औरंगजेबाची आठवण येते. औरंगजेबच्या आयुष्यातही कधीकाळी अशी स्थिती आली होती. त्यावेळी तो स्वत:च्या माणसांना भेटायला घाबरायचा,' अशा शब्दांमध्ये चतुर्वेदी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवं, असंही चतुर्वेदी पुढे म्हणाल्या. 'सुरक्षेवर राजकारण होऊ नये. 2019 नंतरही मोदी राजकीय नेते राहावेत, अशी आमची इच्छा आहे. आम्ही इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासारख्या नेत्यांना हल्ल्यांमध्ये गमावलं आहे. त्यामुळे याचं दु:ख काँग्रेसला माहित आहे,' असं चतुर्वेदी यांनी म्हटलं. याआधी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींची तुलना औरंगजेबाशी केली होती.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस