शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : माझी इज्जत ठेवा, पार्टी गेली तेल लावत - काँग्रेस आमदाराचा अजब प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 14:55 IST

भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेली दिसत असताना काँग्रेसचे नेतेमंडळीच पक्षाच्या अडचणी वाढवताहेत की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भोपाळ - छत्तीसगड, मिझोरम, तेलंगणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्व राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी कंबर कसलीय. भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेली दिसत असताना काँग्रेसचे नेतेमंडळीच पक्षाच्या अडचणी वाढवताहेत की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशीच काहीशी घटना समोर आली आहे. जनतेशी संवाद साधताना काँग्रेस आमदाराची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले.

'पक्षाला भलेही मतं न मिळो,पण माझी व्हॉटबँक माझ्यासोबत राहो', असेच काहीसे विधान काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जीतू पटवारी करताना दिसले आहेत. राउ येथील काँग्रेस आमदार जीतू पटवारी यांनी सोमवारी मॉर्निंग वॉकदरम्यान आपल्या मतदारसंघातील जनतेची भेट घेतली. यावेळेस त्यांनी लोकांना मतं देण्यासाठी आवाहन केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. 

(माझ्या भाषणांमुळे काँग्रेसची मतं कमी होतात- दिग्विजय सिंह)

पण यावेळेस त्यांनी असेही काही विधान केले की यामुळे पटवारी सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. 'तुम्ही माझी काळजी घ्या, तुम्हाला माझी इज्जत ठेवायची आहे... पार्टी गेली तेल लावत', असे विधान पटवारी यांनी मतदारांशी संवाद साधताना केले. यासंबंधीचा पटवारी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ स्वतः जीतू यांनी फेसबुकवर शेअर केला होता. या व्हिडीओवरुन नेटीझन्सकडून त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे.  

तर दुसरीकडे यासंदर्भात स्पष्टीकरण देत असताना जीतू पटवारी यांनी म्हटले की, माझ्या शब्दांचा चुकीच्या पद्घतीनं प्रचार केला जात आहे. क्षेत्रातील वरिष्ठ सदस्यदेखील माझ्या कुटुंबातील सदस्यासमान आहेत. भाजपाकडून माझी प्रतिमा मलिन केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जनसंपर्कावेळी भाजपासाठी मी या शब्दांचा वापर केला होता, असेही त्यांनी सांगितले.  

दरम्यान, आपल्याच नेत्यांच्या विधानांमुळे अडचणी निर्माण होत असल्यानं काँग्रेस चिंतेत आहे. माझ्या भाषणांमुळे काँग्रेसची मतं कमी होतात, असं विधान काँग्रसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ''माझ्या भाषणांमुळे काँग्रेसचं नुकसान होतं. त्यामुळेच मी रॅली आणि जनसभांना संबोधित करत नाही'', असं सिंह म्हणाले होते.  मध्य प्रदेशात दिग्विजय सिंह यांचा चांगला प्रभाव आहे आणि त्यांच्या विधानामुळे पक्षाचे नुकसान होऊ शकले असते, यामुळे पार्टीकडून  यासंदर्भात कठोर भूमिका स्वीकारण्यात आली.

टॅग्स :congressकाँग्रेसDigvijaya Singhदिग्विजय सिंहBJPभाजपा