राहुल गांधींना बरे होण्यासाठी मोदींकडून शुभेच्छा!

By Admin | Updated: May 17, 2016 08:51 IST2016-05-16T19:11:00+5:302016-05-17T08:51:52+5:30

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी तापाने आजारी असून, त्यांना लवकर बरे होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आज दिली.

Congratulations to Rahul Gandhi for healing! | राहुल गांधींना बरे होण्यासाठी मोदींकडून शुभेच्छा!

राहुल गांधींना बरे होण्यासाठी मोदींकडून शुभेच्छा!

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १६ - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी तापाने आजारी असून, त्यांना लवकर बरे होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आज दिली. नड्डा यांनी ट्‌विटरवरून म्हटले आहे की, राहुल गांधी हे तापाने आजारी आहेत. पंतप्रधानांनी त्यांच्या आरोग्याची विचारपूस करून लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.ह्य

दरम्यान, राहुल गांधी यांना ताप आल्याने त्यांनी आपला पुदुच्चेरी, केरळ आणि तमिळनाडूचा दौरा रद्द केला आहे. ते मंगळवारी  दौऱ्यावर जाणार होते.

 

Web Title: Congratulations to Rahul Gandhi for healing!