शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

‘कॅशबॅक’मुळे पेटीएमचा गोंधळ; गुगलने दुपारी अ‍ॅप हटविले, संध्याकाळी परत केले ‘रिस्टोअर’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 1:01 AM

या दिवसभर चाललेल्या गोंधळामुले आपल्या पैशांचे काय होणार? असा प्रश्न करोडो युजर्सना पडला होता. पेटीएम अ‍ॅपच नसेल तर त्यात असलेल्या पैशांचे काय होणार? ते परत मिळणार की नाही? असा प्रश्न त्यांना सतावत होते.

मुंबई : डिजिटल पेमेंट सिस्टिममध्ये मोठा वाटा असलेल्या पेटीएममुळे हे अ‍ॅप वापरणारे लाखो लोक दिवसभर गोंधळात सापडले. आॅनलाइन कसिनोचे आणि अवैध जुगार खेळांमध्ये पैसे टाकण्याची सुविधा दिली जात असेल तर ते नियमांचे उल्लंघन आहे, असे स्पष्ट करीत गुगल प्ले-स्टोअरवरून पेटीएम अ‍ॅप काढून टाकले होते. मात्र, सायंकाळी पुन्हा हे अ‍ॅप डाउनलोड आणि अपडेट्ससाठी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे दिवसभर चाललेला पेटीएमचा गोंधळ अखेर सायंकाळी मिटला.

या दिवसभर चाललेल्या गोंधळामुले आपल्या पैशांचे काय होणार? असा प्रश्न करोडो युजर्सना पडला होता. पेटीएम अ‍ॅपच नसेलतर त्यात असलेल्या पैशांचे काय होणार? ते परत मिळणार की नाही? असा प्रश्न त्यांना सतावत होते. पण गुगलने कारवाई केल्यानंतर पेटीएमने याबाबत खुलासा करीत आम्ही पुन्हा परत येणार असल्याचे म्हटले होते. तुमचे पेटीएमवर असलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित असून तुम्ही नेहमीप्रमाणे व्यवहार करू शकता, असेही कंपनीने स्पष्ट केले होते.

गुगल प्ले-स्टोअरची पॉलिसी काय?पेटीएम अ‍ॅप हटवल्यानंतर गुगलने म्हटले होते की, आम्ही आॅनलाइन कॅसिनो किंवा कोणत्याही नियमनाविरोधातील जुगार खेळांना समर्थन देत नाही. कोणत्याही अ‍ॅपच्या माध्यमातून बाहेरच्या वेबसाइटलाही पैशाच्या माध्यमातून जुगार खेळण्याची परवानगी देण्यात असेल किंवा जिंकणाऱ्याला पैसे/रोख बक्षिसे दिली जात असतील, तर ते नियमांचे उल्लंघन आहे. जर कोणी नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्या अ‍ॅप डेव्हलपरला तशी सूचना दिली जाते आणि जोवर संबंधित अ‍ॅप प्ले-स्टोअरच्या नियमात न बसण्या-या गोष्टी काढत नाही तोवर ते अ‍ॅप प्ले-स्टोअरवरून काढले जाते.गोंधळ का उडाला?‘पेटीएम क्रिकेट लीग’ हे आॅनलाइन फिचर पेटीएमवर आहे. त्यावर शुक्रवारी सकाळी कॅशबॅक आॅफर सुरू करण्यात आली होती.हे फिचर गुगल प्ले-स्टोअरच्या धोरणात बसत नाही, असे गुगलकडून पेटीएमला कळवण्यात आले. याच कारणामुळे काही गुगल प्ले-स्टोअरने कारवाई केल्याचे पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी म्हटले आहे. आता पेटीएम या अ‍ॅपमधून कॅशबॅकचा भागच काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे ते प्ले-स्टोअरवर पुन्हा उपलब्ध झाले आहे.

टॅग्स :Paytmपे-टीएमtechnologyतंत्रज्ञान