महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा मुद्द्यावर एकमत होताना दिसत नाही. अजित पवारांच्या निधनामुळे विलिनीकरणाचे काय होणार, अशीही चर्चा होत असून, मंगळवारी (३ जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
अजित पवारांकडून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात पुढाकार घेण्यात आला होता आणि चर्चाही पूर्ण झाली होती, असा दावा शरद पवारांच्या पक्षाचे नेते करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते मात्र विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावत आहेत. महाराष्ट्रात यावरून राजकीय गोंधळाचे चित्र असतानाच प्रफुल पटेल यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
प्रफुल पटेल यांनी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. पटेल यांची दोन्ही नेत्यांनी बंद दाराआड चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी प्रत्येकी पाच ते सहा मिनिटे चर्चा झाली. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्याने पहिल्यांदाच भाजपाच्या या दोन महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली.
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. सुनेत्रा पवार महायुती सरकारमध्ये आल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्वही त्यांच्याकडेच जाणार असल्याचे सांगितले जाते. पण, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचे विलिनीकरण हाही मुद्दा सध्या महत्त्वाचा बनला आहे, या सगळ्याच स्थितीबद्दल प्रफुल पटेल यांनी दोन्ही नेत्यांशी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.
सुनेत्रा पवार दिल्ली दौरा करणार?
प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट का घेतली याबद्दलचा तपशील समोर आला नाही. दरम्यान, सुनेत्रा पवार पुढच्या काळात दिल्लीत जाणार असून, या भेटीत त्या पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार असल्याचे कळते.
Web Summary : Uncertainty surrounds NCP merger. Praful Patel met Modi and Shah amid merger talks and political shifts after Ajit Pawar's demise. Sunetra Pawar's Delhi visit is anticipated.
Web Summary : राकांपा विलय पर अनिश्चितता बरकरार है। प्रफुल्ल पटेल ने अजित पवार के निधन के बाद विलय वार्ता और राजनीतिक बदलावों के बीच मोदी और शाह से मुलाकात की। सुनेत्रा पवार की दिल्ली यात्रा अपेक्षित है।