शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
3
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
4
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
5
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
6
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
7
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
8
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
9
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
10
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
11
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
12
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
13
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
14
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
15
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
16
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
17
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
18
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
19
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
20
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिकांचा संभ्रम मिटेना

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

स्थानिकांचा संभ्रम अजून मिटेना

स्थानिकांचा संभ्रम अजून मिटेना
पेडणे :
पेडणे तालुक्यातील प्रस्तावित मोपा आंतराष्टीय विमानतळ राजकीय हस्तक्षेपामुळे गाजत आहे. मोपा विमानतळाच्या बाजूने आणि विरोधात असे दोन मतप्रवाह गोव्यात आहेत. शिवाय या प्रकल्पांमुळे गोव्याला खराच लाभ होणार आहे का? अशी शंका आहे. तसेच प्रकल्पामुळे पर्यावरण हानीकडे बोट दाखविणारेही विरोधक आहेत.
पुर्वंजानी राखून ठेवलेल्या जमनीवर आपला उदारनिर्वाह चालतो. ही जागा पुढच्या पिढीसाठी राखून ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र, ही जागा सरकारने संपादीत करून तोंडाचा घास हिरवल्याची प्रतिक्रिया शेतकर्‍यांकडून मिळत आहे.
शेतकरी सीताराम परब यांनी सांगितले, एकाच सर्व्हेतील ७० जणांच्या जमिनी या प्रकल्पासाठी गेल्या आहेत. पावसाळ्यात उगवणारा वर्षभरचा चारा विकला तरी सरकारने दिलेल्या नुकसान भरपाईपेक्षा जास्त पैशे मिळतात. त्यामुळे सरकारने योग्य मोबदला द्यावा असे त्यांनी पुढे सांगितले.
कॉग्रेस सरकारने शेतकर्‍यांना विश्वासात न घेताच जमिनीना कवडीमोल दर दिला. त्याचा फटका विधानसभा निवडणूकीत पक्षाला बसला. त्यामुळे भाजप सरकारने शेतकर्‍यांना किमान ६०० रूपये प्रतिचौरस मीटर दर द्यावा अशी मागणी माजी जिल्हापंचायत अध्यक्ष पांडुरंग परब यांनी केली आहे.
पेडणे तालुक्यातील मोपा, वारखंड, चांदेल, कासारवर्णे, उगवे, अमेरे या भागातील जमिनी विमानतळासाठी गेल्या आहेत. मोपा, सडा व कासरवर्णे सड्यावर एकूण १३ धनगरांची घरे आहेत. ही घरे विमानतळामुळे स्थलांतरित करावी लागणार आहेत. सरकराने आपल्याला विश्वासात घेतले नाही. तसेच घर स्थलांतरबाबत आम्हाला कोणतकल्पनाही देण्यात आलेली नाही. सरकारचा एकहीअधिकारी जनसुनावणीनंतर आपल्या वस्तीत फिरकला नसल्याचे धनगर समाजाचे मत आहे.
नियोजित मोपा विमानतळामुळे येथील धनगर कंुटुबीयांचे संसार रस्त्यावर येणार आहेत. धनगर समाजाने आपल्याला कासारवर्णे सड्यावर एकाच ठिकाणी जागा देण्यात यावी. अशी मागणी जोर धरत आहे. सडा येथील घरे देवस्थान, देशप्रभू, परब, कांबली, फौजदार यांच्या मालकिची आहेत.
पूर्वजापांसून आमची लोकवस्ती आहे. परंतु सरकराने वीज, पाणी पुरविली नाही. वीज नसल्याने रात्रीच्या वेळी गॅस, मेणबत्ती, पेटेल दिव्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे कामे लवकर उरकावी लागतात. या फस्तीत अजूनही मातीच्या घरोघरी चुली आहेत. असे धनगर समाजातील नमिशा वरळ यांनी सांगितले. पाण्याची सुविधा नसल्याने पाण्यासाठी ३ ि़कमी पायी चालत जावे लागते. या समाजातील लोकांच्या मुलांना शिक्षणाची सोय नाही. त्यासाठी मुलांना ३ कि.मी पायी शाळेला जावे लागते. असे वरक पुढे म्हणाल्या.
धनगर समाजातील लोकांना विमानाचे कुतूहल असले करीही घर संसाराची चिंता जास्त आहे. घरावर बुलडोझर फिरवून घरांचे कुठल्या कुठे स्थलांतर करतील अशी भिती त्यांना वाटत आहे. समाजातील सगळ्या लोकांची घरे एकाच ठिकाणी स्थलांतरीत करावी. तसेच वीज, पाणी, रस्ता व योग्य मोबदला देण्यात यावा. विमानतळाला विरोध नाही. परंतु सरकराने पुढच्या पिढीचा विचार करावा अशी मागणी होत आहे. (प्रतिनिध)
फोटो ओळी : मोपा सड्यावरील धनगरांची घरे, मुले पायी चालत शाळेत जाताना व काडूच्या बागायती. (छाया : निवृत्ती शिरोडकर)
....................