छेडछाडीला विरोध; २० विद्यार्थिनी, दोन चालकांवर हल्ला
By Admin | Updated: March 5, 2015 23:49 IST2015-03-05T23:49:46+5:302015-03-05T23:49:46+5:30
बोर्डाची परीक्षा देऊन परतणाऱ्या शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या बाईकस्वारांना विरोध करणाऱ्या दोन स्कूलबसचालकांवर बुधवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला़

छेडछाडीला विरोध; २० विद्यार्थिनी, दोन चालकांवर हल्ला
मुजफ्फरनगर : बोर्डाची परीक्षा देऊन परतणाऱ्या शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या बाईकस्वारांना विरोध करणाऱ्या दोन स्कूलबसचालकांवर बुधवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला़ या हल्ल्यात स्कूलबसचे दोन्ही चालक आणि एक विद्यार्थिनी जखमी झाली़
पोलीस अधीक्षक विजय भूषण यांनी गुरुवारी ही माहिती दिली़ काल सर्व विद्यार्थिनी कमलपूर केंद्रावर परीक्षा देऊन स्कूलबसने घरी पतरत होत्या़ यावेळी आठ बाईकस्वार युवकांनी कथितरीत्या बसमधील मुलींची छेड काढणे सुरू केले़ एवढे करून ते थांबले नाहीत तर त्यांनी या मुलींची बस अडवण्याचेही प्रयत्न केले़ स्कूलबसचे चालक संजय आणि वेदपाल यांनी या छेडछाड करणाऱ्या मुलांना विरोध केला़ यामुळे बाईकस्वार मुले संतापले व त्यांनी दोन्ही चालकांवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवला़ यात दोघेही जखमी झाले़ युवकांनी बसवरही दगडफेक केली़ यात एक विद्यार्थिनीही जखमी झाली़
याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून राजेश व विजय नामक दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे़ अन्य आरोपी फरार आहेत़ (वृत्तसंस्था)