काश्मिरात पुन्हा इसिसचा झेंडा सुरक्षा दल आणि युवकांच्या गटात संघर्ष
By Admin | Updated: July 18, 2015 01:12 IST2015-07-18T01:12:31+5:302015-07-18T01:12:31+5:30
श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या श्रीनगर येथील नोहा भागात शुक्रवारी सुरक्षा दल आणि युवकांच्या एका गटात संघर्ष उडाला. यादरम्यान काही फुटीरवादी तत्त्वांनी पुन्हा एकदा पाकिस्तान, लष्कर-ए-तोयबा आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया अर्थात इसिस या अतिरेकी संघटनेचे झेंडे फडकवले.

काश्मिरात पुन्हा इसिसचा झेंडा सुरक्षा दल आणि युवकांच्या गटात संघर्ष
श रीनगर : जम्मू काश्मीरच्या श्रीनगर येथील नोहट्टा भागात शुक्रवारी सुरक्षा दल आणि युवकांच्या एका गटात संघर्ष उडाला. यादरम्यान काही फुटीरवादी तत्त्वांनी पुन्हा एकदा पाकिस्तान, लष्कर-ए-तोयबा आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया अर्थात इसिस या अतिरेकी संघटनेचे झेंडे फडकवले.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोहट्टा भागातील जामा मशिदीत नमाज अदा केल्यानंतर युवकांच्या एका समूहाने वादग्रस्त झेंडे फडकवत फुटीरवादी आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ नारेबाजी केली. येथे तैनात पोलिसांनी त्यांना मज्जाव करताच त्यांनी पोलिसांच्यादिशेने दगडफेक सुरू केली. या फुटीरवादी तत्त्वांना पांगवून लावण्यासाठी पोलिसांना अखेर अश्रूधूराचे नळकांडे फोडत, सौम्य लाठीमार करावा लागला. काही युवकांनी नोहट्टा चौक ते खनयार चौकाकडे पळण्याआधी तिरंगा पेटवून दिला. तेथे हजर पोलीस व सीआरपीएफ जवानांनी त्यांना रोखले असता, संघर्ष उडाला. वृत्त लिहिपर्यंत हा संघर्ष सुरू होता. यात कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.