शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

वादग्रस्त तांत्रिक चंद्रास्वामी यांचे निधन

By admin | Published: May 23, 2017 8:34 PM

वादग्रस्त तांत्रिक चंद्रास्वामी यांचे वयाच्या 66व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 23 - वादग्रस्त तांत्रिक चंद्रास्वामी यांचे वयाच्या 66व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या अनेक वर्षांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. नरसिंहरावांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात चंद्रास्वामी मीडियाच्या केंद्रस्थानी होते. दिवंगत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे गुरू म्हणून चंद्रास्वामी परिचित होते. नरसिंहराव पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यानंतर चंद्रास्वामींना प्रसिद्धी मिळाली. 1948मध्ये जन्माला आलेल्या चंद्रास्वामींचे कागदोपत्री नाव नेमिचंद होते. राजकीय नेत्यांपासून ते सिनेसृष्टीसह गुंडपुंड मंडळींचे चंद्रास्वामी हे गुरू होते. नरसिंहरावांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात चंद्रास्वामी यांनी दिल्लीत आश्रम बांधले होते. त्यावेळी आश्रमासाठी इंदिरा गांधींनी जमीन दिल्याची चर्चा होती. ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर, हॉलिवूडमधील अभिनेत्री एलिझाबेथ टेलर, बहरीनचे राजेसुद्धा चंद्रास्वामी यांच्या भक्त होत्या. चंद्रास्वामी हे वादग्रस्त तांत्रिक म्हणून लोकांना परिचित होते. लंडनमध्ये एका व्यावसायिकाला एक लाख डॉलरचा चुना लावल्याप्रकरणी त्यांनी जेलचीही हवा खाल्ली होती. विशेष म्हणजे राजीव गांधींच्या हत्यारांना चंद्रास्वामींनी पैसे पुरवण्याचाही आरोप करण्यात आला होता. 2009मध्ये सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या परदेश दौ-यावरील निर्बंध हटवले होते. चंद्रास्वामी यांना काही दिवसांपूर्वी अर्धांगवायू या आजारानं पछाडलं होतं. या आजारामुळे अवयवदेखील निकामी झाले होते. आज दुपारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचं अपोलो रुग्णालयाने सांगितले आहे.