शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरांना चोख उत्तर देण्याची केंद्राची ग्वाही

By admin | Updated: December 25, 2014 01:46 IST

आसाममधील दहशतवादी कृत्याची तीव्र शब्दात निर्भर्त्सना करतानाच बंडखोरांना सडेतोड उत्तर दिले जाईल, अशी ग्वाही गृहमंत्री राजनाथ सिंह

गुवाहाटी/नवी दिल्ली : आसाममधील दहशतवादी कृत्याची तीव्र शब्दात निर्भर्त्सना करतानाच बंडखोरांना सडेतोड उत्तर दिले जाईल, अशी ग्वाही गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत बोलताना दिली. तर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री तरुण गोगई यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीएफबीच्या सोंगबिजित गटाच्या सशस्त्र बंडखोरांनी मंगळवारी रात्री आसामच्या दुर्गम भागातील तीन जिल्ह्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सोनितपूर जिल्ह्यातील ३७, कोकराझर येथील २५ आणि चिरांग जिल्ह्यात ३ जण ठार झाले होते. या हत्याकांडाविरुद्ध आदिवासींनी सुरु केलेले आंदोलन सोनितपूर जिल्ह्याच्या धेकियाजुलीमध्ये हिंसक झाले. आधी पोलिसांनी लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव काबूत न आल्यामुळे अखेर पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात तिघे ठार झाले, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, आंदोलकांवरील पोलिसांच्या गोळीबाराचा राज्यात सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)