शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

अविवाहित महिलांमध्ये वाढतेय कंडोमची मागणी, दहा वर्षात 6 टक्क्यांनी वाढला वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 9:40 AM

आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण 2015-16 नुसार, 15 ते 49 वर्षीय अविवाहित महिला ज्या सेक्शुअली अॅक्टिव्ह आहेत त्यांच्यात गेल्या 10 वर्षात कॉन्डमच्या वापर वाढला असून 2 टक्क्यांवरुन 12 टक्क्यांवर पोहोचला आहे

नवी दिल्ली - भारतात अविवाहित आणि सेक्शुअली अॅक्टिव्ह महिला सुरक्षित सेक्सला महत्व देत आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण 2015-16 नुसार, 15 ते 49 वर्षीय अविवाहित महिला ज्या सेक्शुअली अॅक्टिव्ह आहेत त्यांच्यात गेल्या 10 वर्षात कंडोमचा वापर वाढला असून 2 टक्क्यांवरुन 12 टक्क्यांवर पोहोचला आहे. 20 ते 24 वर्षीय वयोगटातील सेक्शुअली अॅक्टिव्ह अविवाहित तरुणींमध्ये कंडोमचा जास्तीत जास्त वापर केला जात आहे. सर्व्हेक्षणनुसार, आठपैकी तीन पुरुषांचं म्हणणं आहे की गर्भधारणा महिलांची जबाबदारी आहे आणि याच्याशी पुरुषांचं काही देणं घेणं नाही.

कुटुंब नियोजनासाठी महिलांची नसबंदीराष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणानुसार 25 ते 49 वर्ष वयोगटातील महिला गर्भधारणा होऊ नये यासाठी नसबंदीला प्राथमिकता देत आहेत. सर्व्हेक्षणानुसार, फक्त एक टक्का महिलांनी आपण इमरजन्सी कॉन्ट्रसेप्टिव्ह पिलचा वापर केल्याचं मान्य केलं आहे. 

गर्भनिरोधकांच्या वापरात पंजाब सर्वात पुढे देशभरात गर्भनिरोधकाच्या पद्धतींचा सर्वात कमी वापर मणिपूर, बिहार आणि मेघालयात केला जातो. या राज्यांमध्ये ही टक्केवारी फक्त 24 टक्के आहे. गर्भनिरोधकांचा वापर करण्याच्या यादीत पंजाब पहिल्या क्रमांकावर असून येथे ही टक्केवारी 76 टक्के इतकी आहे. केंद्रशासित राज्यांबद्दल बोलायचं गेल्यास, 30 टक्क्यांसोबत लक्ष्यद्वीप सर्वात मागे असून चंदिगड 74 टक्क्यांसहित पहिल्या क्रमांकावर आहे. 

गोळ्यांच्या वापरात घट मात्र कंडोमच्या वापरात वाढसर्व्हेत हेदेखील समोर आलं आहे की, देशभरात अत्याधुनिक गर्भनिरोधाच्या पद्धतींचा वापर करण्यात 65 टक्क्यांसोबत शिख आणि बौद्ध धर्मातील महिला सर्वात पुढे असून, मुस्लिम महिलांमध्ये हे प्रमाणत फक्त 38 टक्के आहे. गर्भनिरोधकांच्या वापराचा संबंध आर्थिक परिस्थितीशीदेखील आहे. गरिब घरातील फक्त 36 टक्के महिला गर्भनिरोधकांचा वापर करत असताना, श्रीमंत कुटुबांमधील 53 टक्के महिला कॉन्ट्रसेप्टिव्हचा वापर करतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणात एकूण 6 लाख 1 हजार 509 घरांमध्ये जाऊन मुलाखती घेण्यात आल्या. यामधील 98 टक्के लोकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या.