राकाज क्लबप्रकरणी महापालिकेचा युक्तिवाद पूर्ण
By admin | Updated: February 3, 2016 00:28 IST
औरंगाबाद : राकाज क्लबचा भाडेपट्ट्याचा करार रद्द करणार्या महापालिकेच्या आदेशासंदर्भात तात्पुरता मनाई हुकूम मागणार्या दाव्याच्या अनुषंगाने महापालिकेचा युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला. शलाका इंजिनिअर्सच्या राकाज लाईफ स्टाईल क्लबचे सुनील राका यांनी हा दावा दाखल केला आहे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर (महापालिका) एस.जे. बियाणी यांच्या समोर सुनावणी सुरू झाली असून, मनपाच्या वतीने ॲड. अतुल कराड यांनी बाजू मांडली. पुढील सुनावणी ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
राकाज क्लबप्रकरणी महापालिकेचा युक्तिवाद पूर्ण
औरंगाबाद : राकाज क्लबचा भाडेपट्ट्याचा करार रद्द करणार्या महापालिकेच्या आदेशासंदर्भात तात्पुरता मनाई हुकूम मागणार्या दाव्याच्या अनुषंगाने महापालिकेचा युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला. शलाका इंजिनिअर्सच्या राकाज लाईफ स्टाईल क्लबचे सुनील राका यांनी हा दावा दाखल केला आहे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर (महापालिका) एस.जे. बियाणी यांच्या समोर सुनावणी सुरू झाली असून, मनपाच्या वतीने ॲड. अतुल कराड यांनी बाजू मांडली. पुढील सुनावणी ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.ज्योतीनगरातील राकाज क्लबसोबतचा महापालिकेचा करार रद्द करण्याचा आदेश बेकायदेशीर असल्याचे घोषित करावे, तसेच क्लब परिसराला लावण्यात आलेले सील उघडण्यात यावे, अशी विनंती या दाव्यात करण्यात आली आहे, तर मनपाची सर्व प्रक्रिया रीतसर असून आजही ताबा मनपाकडेच असल्याचे ॲड. अतुल कराड यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. वादी सुनील राका हे जागेवर त्यांचा ताबा असल्याचे म्हणत आहेत, ते चूक आहे. त्यांनी खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत स्वत: कबूल केले आहे की, वरील जागेवर त्यांचा ताबा नाही. तसेच जिल्हा न्यायालयानेदेखील जागा मनपाच्याच ताब्यात असल्याचा निकालात उल्लेख केला आहे. या निकालाला राका यांनी कोणत्याही न्यायालयात आव्हान दिले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. राकाच्या वतीने मोठी गुंतवणूक केली म्हणून बेकायदेशीररीत्या व्यवसाय करण्याची मुभा दिली, असा त्याचा अर्थ होत नाही, असा युक्तिवाद मनपाच्या वतीने ॲड. कराड यांनी केला. त्यांना ॲड. दीपक पडवळे आणि ॲड. गिरीश कुलकर्णी यांनी सहकार्य केले, तर राकांच्या वतीने ॲड. एस.आर. नेहरी काम पाहत आहेत.