विदेशी पर्यटकांच्या मोबाइलची तक्रार साध्या कागदावऱ़़
By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:30+5:302015-08-31T00:24:30+5:30
पोलिसांचे असहकार्य : तक्रार नोंदविण्यासाठी पायपीट

विदेशी पर्यटकांच्या मोबाइलची तक्रार साध्या कागदावऱ़़
प लिसांचे असहकार्य : तक्रार नोंदविण्यासाठी पायपीटनाशिक : सिंहस्थ कुंभमेळा पाहण्यासाठी इस्त्रायलहून आलेल्या पर्यटकांचा रामकुंड परिसरात ४६ हजार रुपयांचा मोबाइल गहाळ झाला़ याची तक्रार दाखल करण्यासाठी त्यांनी पोलिसांकडे मदत मागितली, मात्र अखेरपर्यंत ती मिळालीच नाही़ शहरातील दोघांनी त्यांच्याशी संभाषण साधल्यानंतर ते कसेबसे सरकारवाडा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले़ मात्र या ठिकाणी त्यांना पंचवटी पोलीस ठाणे गाठण्याचा अजब सल्लाही दिला गेला़ सरतेशेवटी साध्या कागदावर तक्रार लिहून या विदेशी पर्यटकांची बोळवण करण्यात आली़सिंहस्थ कुंभमेळा पाहण्यासाठी इस्त्रायल येथून डॅनियल व नोगा हे दोघे जण भारतात आले आहेत़ हॉटेल पंचवटी येथे वास्तव्यास असलेले हे दोघे सिंहस्थ पर्वणी पाहण्यासाठी शनिवारी पहाटे चार वाजेपासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत ते रामकुंड परिसरात होते़ यादरम्यान डॅनियल यांचा ७५० डॉलरचा अर्थात ४६ हजार रुपयांचा मोबाइल गर्दीमध्ये खिशातून गहाळ झाला़ यानंतर नोगा व डॅनियन यांनी तेथील स्थानिक पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी मदतही मागूनही ती मिळाली नाही़ त्या ठिकाणाहून हे दोघे रविवार कारंजा येथे आल्यानंतर सचिन भामरे व धनंजय दुबे यांनी त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांना सत्य कळाले़यानंतर त्यांनी या दोघांसह सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले असता तेथे घटनेचा परिसर हा पंचवटी पोलीस ठाण्यातंर्गत येत असल्याचे सांगितले गेले़ यानंतर वरिष्ठ उपस्थित नसल्याचे कारण देत डॅनियल यांनाच एका कोर्या कागदावर मोबाइल गहाळ झाल्याचे तक्रार देण्यास सांगण्यात आले़ मुळात सरकारवाडा पोलिसांनी एनसी किंवा एआयआर दाखल करून घेऊन तो गुन्हा पंचवटी पोलिसांकडे वर्ग करणे अपेक्षित होते़ मात्र तसे न करता त्यांनी विदेशी पर्यटकांची केवळ साध्या कागदावर तक्रार घेऊन त्यांची बोळवण केली़ --कोट--देशाची प्रतिमा मलीऩ़़सिंहस्थासाठी आलेल्या या विदेशी भाविकांची कोर्या कागदावर तक्रार अर्ज घेतल्याने भारतात आजही कोर्या कागदावरच तक्रार दाखल केली जात असल्याचा संदेशच जणू गेला आहे़- धनंजय दुबे, नाशिक़फोटो :- आर / फोटो / पर्यटक मोबाईल चोरी २विदेशी पर्यटक नोगा व डॅनियल यांना पोलिसात तक्रार करण्यास मदत करणारे सचिन भामरे व धनंजय दुबे़फोटो :- आर / फोटो / पर्यटक मोबाईल चोरी ३सरकारवाडा पोलिसांना विदेशी पर्यटक डॅनियल यांच्याकडून लिहून घेतलेला तक्रार अर्ज़