उत्तर प्रदेशच्या न्यायालयात ओबामांविरुद्ध तक्रार
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:30+5:302015-02-11T00:33:30+5:30
अलाहाबाद- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेशातील एका न्यायालयात त्यांनी भारताची धर्मनिरपेक्ष प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून एक तक्रार दाखल करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशच्या न्यायालयात ओबामांविरुद्ध तक्रार
अ ाहाबाद- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेशातील एका न्यायालयात त्यांनी भारताची धर्मनिरपेक्ष प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. न्यायदंडाधिकारी नीलिमासिंग यांनी या प्रकरणावरील सुनावणीसाठी १८ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे. सुशीलकुमार मिश्रा नामक एका वकिलाने ही तक्रार दाखल केली असून भारतात धार्मिक असहिष्णुता आहे या ओबामा यांच्या वक्तव्याने देशाची प्रतिमा खराब झाली असल्याचे त्यांनी यात नमूद केले आहे. ओबामा यांना समन्स जारी करण्यात यावा आणि त्यांच्याविरुद्ध बदनामीचा खटला चालविण्यात यावा,अशी त्यांची मागणी आहे. (वृत्तसंस्था)