अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपची पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 05:18 PM2019-05-19T17:18:29+5:302019-05-19T17:38:37+5:30

भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे की, केजरीवाल आणि सिसोदिया यांना ठार मारण्याचा खोटा आरोप माझ्यावर केला जात आहे.

Complaint against BJP policeman against Arvind Kejriwal | अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपची पोलिसात तक्रार

अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपची पोलिसात तक्रार

Next

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या शेवटच्या टप्यात हि राजकरण तापतांना दिसत आहे. भाजपकडून माझी हत्या होऊ शकते असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता . याप्रकरणी भाजपकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.  भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यात केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

पंतप्रधान इंदिरा गांधींप्रमाणे माझे सुरक्षारक्षक मला ठार मारतील असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला होता. सुरक्षारक्षकांच्यामदतीने भाजप माझी हत्या करण्याचा कट रचत असल्याचा आरोप सुद्धा केजरीवाल यांनी केला होता. भाजपने केजरीवाल यांच्या आरोपावर आक्षेप घेतला असून अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध थेट पोलिसात धाव घेतली आहे.

भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे की, केजरीवाल आणि सिसोदिया यांना ठार मारण्याचा खोटा आरोप माझ्यावर केला जात आहे. उलट माझ्या जीवाला यांच्यापासून धोका आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी याची दखल घेत चौकशी करावी अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.

पंजाब मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान माध्यमांशी बोलताना, केजरीवाल यांनी भाजपवर आपली हत्या करण्याचे प्रयत्न करत असल्याचे आरोप लावले होते. आतापर्यंत आपल्यावर ५ वेळा हल्ला झाला आहे. मी केलेला विकास त्यांना पचत नाही, त्यामुळेच भाजप मला संपवणार असा दावा त्यांनी केला होता. याप्रकरणी विजेंद्र गुप्ता यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळंच वळण प्राप्त झालं आहे.


 

Web Title: Complaint against BJP policeman against Arvind Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.