संजय बांगरची तुलना गॅरी कस्टर्नशी
By Admin | Updated: June 1, 2014 00:34 IST2014-06-01T00:34:47+5:302014-06-01T00:34:47+5:30
पंजाबला फायनलचे तिकीट मिळवून देणा:या वीरेंद्र सेहवागने संघाचे प्रशिक्षक संजय बांगरची तुलना भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कस्टर्नशी केली आह़े

संजय बांगरची तुलना गॅरी कस्टर्नशी
>मुंबई : चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या क्वालिफायर लढतीत 58 चेंडूंत 122 धावांची खेळी करून किंग्ज इलेव्हन पंजाबला फायनलचे तिकीट मिळवून देणा:या वीरेंद्र सेहवागने संघाचे प्रशिक्षक संजय बांगरची तुलना भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कस्टर्नशी केली आह़े बांगर हे कस्टर्न एवढेच शांत आहेत, असेही सेहवागने म्हटले आह़े सामन्यानंतर सेहवाग म्हणाला, की आमच्या संघाचे प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे संघाला यश मिळाले आह़े त्यांनी संघातील प्रत्येकी खेळाडूला चांगल्या कामगिरीसाठी प्रेरित केले आह़े त्यांची तुलना गॅरी कस्टर्नशी केली जाऊ शकत़े टीम इंडियाने 2क्11 मध्ये कस्टर्न यांच्या मार्गदर्शनाखाली वन-डे विश्वचषकावर आपले नाव कोरले होत़े सेहवागने पुढे सांगितले, की मला अशाच खेळीची ब:याच दिवसांपासून प्रतीक्षा होती़ मोक्याच्या क्षणी अशी खेळी करता आली याचा आनंद आह़े आता फायनलमध्येही कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करणार आह़े
हा खेळाडू पुढे म्हणाला, की पंजाबविरुद्ध मोठी खेळी करता आली, याचा आनंद आह़े मात्र, तरीही फलंदाजीवर आणखी मेहनत घेणार आह़े ज्या त्रुटी आहेत़ त्या दूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. (वृत्तसंस्था)