शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या 48 वर्षांशी माझ्या 48 महिन्यांच्या कारकिर्दीची तुलना करा, मोदींचे आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 18:11 IST

येत्या मे महिन्यात माझ्या नेतृत्वाखालील सरकार 48 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करत आहे. आता काँग्रेसच्या 48 वर्षांच्या कारभाराशी आमच्या 48 महिन्यांच्या कारभाराची तुलना करून पाहा, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

पुद्दुचेरी -  येत्या मे महिन्यात माझ्या नेतृत्वाखालील सरकार 48 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करत आहे. आता काँग्रेसच्या 48 वर्षांच्या कारभाराशी आमच्या 48 महिन्यांच्या कारभाराची तुलना करून पाहा, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुद्दुचेरी येथील श्री अरविंद आश्रमाला भेट दिली. त्यानंतर एक सभेला संबोधित केले. त्यावेळी मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. आपला देश 1947 साली स्वतंत्र झाला. मात्र जगात असे अनेक देश आहेत जे आमच्यानंतर स्वतंत्र होऊन देखील विकासाच्या मार्गावर आमच्या पुढे गेले आहेत. आपल्या देशातील राजकीय संस्कृती आणि सरकारी संस्कृतीमध्ये आम्ही विकासाच्या मार्गात बरेच मागे राहिलो आहोत त्याबाबत आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.  काँग्रेसवर मोदींचे टीकास्त्र मोदी म्हणाले, "आतापर्यंतच्या इतिहासावर नजर टाकली तर आमच्या पहिल्या पंतप्रधानांनी 17 वर्षे देशाचा कारभार सांभाळला. त्यानंतर त्यांच्या मुलीने 14 वर्षे त्यानंतर त्यांच्या मुलीच्या मुलग्याने पाच वर्षे पंतप्रधानपद सांभाळले. तर 2004 ते 2014 या काळात हे कुटुंब रिमोट कंट्रोलद्वारे सरकार चालवत होते. बेरीज केली तर एकूण 48 वर्षे एकाच कुटुंबाने देश चालवला. त्यांनी 48 वर्षे सरकार चालवले. तर या मे महिन्यात आमच्या सरकारला 48 महिने पूर्ण होणार आहेत. आता त्यांनी 48 वर्षांत काय केले आणि आम्ही 48 महिन्यांत काय केले याची तुलना देशातील विद्वान मंडळींनी करावी," यावेळी पुद्दुचेरीच्या रखडलेल्या विकासासाठीही मोदींनी काँग्रेसला जबाबदार धरले. एकेकाळी पुदुच्चेरीमध्ये वस्त्रोद्योग विभागाचे काम उत्तम प्रकारे चालले होते. पण आज त्याची गतवैभव लुप्त झाले आहे. सहकार क्षेत्र शेवटच्या घटका मोजत आहे. येथील वाहतुकीची अवस्था बिकट झाली आहे. तर शहरातील बांधकाम काँग्रेसी संस्कृतीची शिकार झाले आहे. ज्याप्रमाणे  केंद्रात अधिक करून काँग्रेसचे सरकार राहिले आहे. त्याचप्रमाणे पुद्दुचेरीमध्येही काँग्रेसची सत्ता होती.  

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस