शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीच 'जुळवून देणार रेशीमगाठी'; कर्मचाऱ्यांसाठी सुरू केली मेट्रोमोनियल साईट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 14:57 IST

कंपनीच्या सुरू केलेल्या पोर्टलमध्ये कंपनीतील कर्मचारी आपल्याच कंपनीत जोडीदार शोधू शकणार आहेत.

नवी दिल्ली - इंडियन ऑईल कार्पोरेशन कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या लग्नाच्या गाठी जुळवण्याचं काम हाती घेतलं आहे. सध्या समाजात मुलांची वाढलेली संख्या आणि मुलींच्या कुटुंबीयांच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे लग्न जुळताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच, अद्यापही केवळ आपल्याच जातीमधील, नातेवाईकांमधील कुटुंबात नातं जोडण्याचं, लग्न करण्याचं प्रमाण अधिक आहे. मात्र, आता इंडियन ऑईल कंपनीने कंपनीमार्फतच कर्मचाऱ्या लग्नगाठ बांधण्याची जबाबदारी उचललीय. त्यासाठी, कंपनीने २०२३ मध्ये एक मॅट्रोमॅनियल पोर्टल सुरू केलं आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आता २ लग्नही जमली आहेत. 

कंपनीच्या सुरू केलेल्या पोर्टलमध्ये कंपनीतील कर्मचारी आपल्याच कंपनीत जोडीदार शोधू शकणार आहेत. कंपनीचा हा प्रयत्न यशस्वी झाला असून २ जणांचे शुभ मंगल सावधानही झालं आहे.  IOCians2gether असं कंपनीच्या नवीन पोर्टलचं नाव आहे. या माध्यमातून कंपनीचे सीमा यादव आणि तरुण बंसल हे एकत्र आले होते. त्यानंतर, नुकतेच त्यांनी लग्नही केले. कंपनीच्या या सुविधेतून लग्नगाठ बांधणारे सीमा आणि तरुण हे पहिलं जोडपं ठरलं. त्यामुळेच, या दोघांच्या लग्नाला IOC चे चेअरमन आणि एमडी माधव वैद्य हेही उपस्थित होते. सोशल मीडियावरुन त्यांनी या लग्नाचा फोटो शेअर केला असून त्यास लोकांची चांगली पसंती मिळाली आहे. 

श्रीकांत यांनी सोशल मीडियावर लग्नातील उपस्थितीचा फोटो शेअर केला. त्यासोबतच, आमच्या कंपनीने सुरू केलेल्या 'IOCians2gether' या सुविधेतून तरुण आणि सीमा एकत्र आले आहेत, त्यामुळेच या लग्नासाठी मीही उत्साही होतो. दोघांनाही आयुष्यभरासाठी खूप साऱ्या शुभेच्छा... असं कॅप्शन वैद्य यांनी दिलं आहे. 

दरम्यान, सीमा आणि तरुण हे कंपनीच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभागात गेल्या ५ वर्षांपासून काम करत आहेत. त्यामुळेच, दोघांचे अगोदरपासूनच प्रेम होते, केवळ या मेट्रोमोनियल वेबसाईटमुळे हे लग्न जमल्याचं खोटं आहे, असे नेटीझन्स म्हणत आहेत. तसेच, कंपनीच्या वेबसाईटला प्रमोट करण्यासाठी ही उठाठेव केल्याचा आरोप सोशल मीडिया युजर्संने केला आहे.    

टॅग्स :marriageलग्नSocial Mediaसोशल मीडियाLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट