शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

Communal Violence: आधी रामनवमी आणि आता हनुमान जन्मोत्सव; लाउडस्पीकर वादामुळे होतोय हिंसाचार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 11:34 AM

Communal Violence: गेल्या अनेक दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये लाऊडस्पीकरवर अजान वाजवण्यास विरोध सुरू आहे. देशातील वातावरण बिघडण्यामागे हाच वाद असल्याचे मानले जात आहे.

नवी दिल्ली: मागील काही दिवसांत झालेल्या हिंसाचारावरुन देशातील जातीय तणाव(Communal Violence) वाढत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी रामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत दगडफेक, जाळपोळ अशा घटना समोर आल्या होत्या. कालही हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन समाजातील लोक आमनेसामने आले. यादरम्यान, दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. 

लाउडस्पीकर वादाचे पडसाद?गेल्या अनेक दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये लाऊडस्पीकरवर अजान वाजवण्यास विरोध सुरू आहे. लाऊडस्पीकरवर अजान वाजवणे बंद केले नाही, तर दिवसातून पाच वेळा लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसाही वाजवू, असे अनेक पक्षांचे नेते म्हणत आहेत. देशातील वातावरण बिघडण्यामागे लाऊडस्पीकरचा वाद असल्याचे मानले जात आहे. 

शनिवारी काय झाले?शनिवारी नवी दिल्लीतील जहांगीरपुरमध्ये हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन समाजाचे लोक आमनेसामने आले. वातावरण इतके बिघडले की, वादाचे रुपांतर दंगलीत झाले. जहांगीरपुरीच्या कुशल सिनेमाजवळून हनुमान जयंतीची मिरवणूक जात असताना हा गोंधळ झाला. हिंसाचारादरम्यान अनेक वाहनांना आग लावण्यात आली. दगडफेक करणाऱ्या जमावाच्या हातात काठ्या आणि तलवारीही दिसत होत्या. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात 6 पोलिसांसह 7 जण जखमी झाले आहेत. 

रामनवमीला गदारोळ झालायापूर्वी देशातील अनके शहरांमध्ये रामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकांवरही दगडफेकीसह जाळपोळ करण्यात आली होती. दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, गोवा, महाराष्ट्र, झारखंड, बिहार, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांत जातीय तणाव दिसून आला. या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर 36 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रातून लाउडस्पीकर वादाला सुरूवातमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यादिवशी महाराष्ट्रातील मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केली होती. त्यांनी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. 3 मे पर्यंत मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवले नाहीत तर मशिदींसमोरील लाऊडस्पीकरवरून हनुमान चालीसा वाजवायला सुरुवात करतील, अशी घोषणा राज ठाकरे यांनी दिली आहे. तिकडे मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटकमधील भाजप नेतेही मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याबाबत बोलत आहेत.

टॅग्स :delhi violenceदिल्लीMaharashtraमहाराष्ट्रdelhiदिल्लीMadhya Pradeshमध्य प्रदेशMNSमनसे