शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमुळे काय-काय झालं स्वस्त, कसा झाला फायदा?; जेटलींच्या पुण्यतिथीला अर्थखात्याने केला नफ्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 12:57 IST

जीएसटी लागू करण्यात जेटलींची भूमिका महत्त्वाची; अर्थ मंत्रालयाकडून दिवंगत माजी अर्थमंत्र्यांच्या कार्याला उजाळा

नवी दिल्ली: भाजपाचे दिवंगत नेते अरुण जेटलींच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त अर्थ मंत्रालयानं त्यांच्या कार्याला उजाळा दिला आहे. अरुण जेटली अर्थमंत्री असताना वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला. 'जीएसटी लागू करण्यात अरुण जेटलींची भूमिका महत्त्वाची होती. भारतीय कर रचनेतील सर्वात मोठ्या सुधारणांपैकी एक असलेल्या जीएसटीच्या अंमलबजावणीत जेटलींचं मोठं योगदान होतं,' अशा शब्दांत अर्थ मंत्रालयानं त्यांच्या कार्याचा गौरव केला.अर्थ मंत्रालयानं ट्विटसोबत काही आकडेवारी दिली आहे. त्यात जीएसटी लागू होण्यापूर्वी गृहपयोगी वस्तूंवर आकारला जाणारा कर आणि आताचा आकारण्यात येणाऱ्या जीएसटीची तुलना केली आहे. केशतेल, टूथपेस्ट आणि साबण यांच्यावर आधी २९.३ टक्के इतका कर लागत होता. मात्र जीएसटी लागू झाल्यापासून आता या वस्तूंवर १८ टक्के जीएसटी लागतो, अशी आकडेवारी अर्थ मंत्रालयानं ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.जीएसटी लागू होण्यापूर्वी देशात जवळपास १७ प्रकारचे विविध कर आकारले जात होते. मात्र १ जुलै २०१७ पासून जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली आणि एक देश, एक कर लागू झाला. त्यात जेटलींचा मोठा वाटा होता. २०१४ मध्ये देशात भाजपाचं सरकार आल्यानंतर जेटलींकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्याच कार्यकाळात जीएसटी लागू झाला. 'जीएसटीमुळे दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या अनेक वस्तू स्वस्त झाल्या. याशिवाय देशातील आयकर भरणाऱ्यांची संख्यादेखील जवळपास दुप्पट होऊन १.२४ कोटींवर पोहोचली,' असं अर्थ मंत्रालयानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.जीएसटीचा सर्वसामान्यांना खूप मोठा फायदा झाल्याचं अर्थ मंत्रालयानं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'जीएसटी लागू झाल्यापासून अनेक वस्तूंवरील कर कमी झाले. सध्याच्या घडीला २८ टक्के कर असलेल्या स्लॅबमध्ये केवळ अतिशय महागड्या चैनीच्या वस्तूंचा समावेश होतो. २८ टक्क्यांच्या स्लॅबमधील २३० पैकी २०० वस्तूंवरील कर कमी केला गेला आहे,' अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे.

टॅग्स :GSTजीएसटीArun Jaitleyअरूण जेटली