शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाविरोधात मिशन ४००; विरोधकांचा २०२४ च्या निवडणुकीसाठी 'गेम प्लॅन' काय? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 06:18 IST

तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि अन्य मोठ्या राज्यात छाप पाडू न शकलेल्या भाजपने हे यश मिळविले होते. विरोधी पक्षांनी तिरंगी, चौरंगी लढती टाळल्या पाहिजेत.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे विरोधी एकजुटीचा नवा फॉर्म्युला विकसित करत आहेत. कारण, अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारच्या संबंधांना विरोध करत आहेत. आतापर्यंत ज्या नेत्यांशी नितीशकुमार यांनी संवाद साधला आहे त्यांना सांगितले आहे की, काँग्रेसशिवाय एकजूट होऊ शकत नाही. 

लोकसभेच्या ४०० जागांवर भाजपच्या विरोधात सर्वांचा एकच उमेदवार उभा करण्याची नितीशकुमार यांची योजना आहे. जर आघाडी झाली नाही तर जागांबाबत तडजोड होऊ शकते. उर्वरित जागांवर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. २०१९च्या निवडणुकीत भाजपला ३००पेक्षा अधिक जागा जिंकता आल्या कारण, विरोधी पक्ष विभागलेला होता. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि अन्य मोठ्या राज्यात छाप पाडू न शकलेल्या भाजपने हे यश मिळविले होते. विरोधी पक्षांनी तिरंगी, चौरंगी लढती टाळल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, काँग्रेसने २०१९मध्ये जवळपास ४७५ जागा लढल्या आणि केवळ ५२ जागा जिंकल्या. जवळपास २२० जागा अशा आहेत जिथे काँग्रेस हा भाजपचा मुख्य विरोधक आहे. अनेक राज्यात एकत्र लढण्याचा फॉर्म्युला राबविणे नितीशकुमार यांच्यासाठी कठीण काम आहे. मात्र, त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे की, ४०० लोकसभा मतदारसंघात एकजूट होऊ शकते.

कोणत्या राज्यात काय परिस्थिती?बिहार, झारखंड, महाराष्ट्र, तामिळनाडू, आसाममध्ये काँग्रेसचे सहकारी पक्ष आहेत. तर, सपा आणि जद (एस) यांच्याशी चर्चा सुरू आहे. डावे पक्ष आणि काँग्रेस केरळात एकमेकांविरुद्ध लढत आहेत. मात्र, तेलंगणात के. चंद्रशेखर राव, प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि ओडिशात नवीन पटनायक हे नेते काँग्रेसला सोबत घेण्याच्या विरोधात आहेत. बसपाच्या प्रमुख मायावती आणि आपचे अरविंद केजरीवाल हे एकटेच निवडणूक लढवितात. त्यांना सोबत आणणे कठीण काम आहे.

सोनिया गांधी यांच्या प्रतीक्षेत विरोधी पक्ष

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी २४ ऑगस्टपासून इटलीमध्ये आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आले होते. त्यांनी येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री आपचे नेते अरविंद केजरीवाल, सीताराम येचुरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उर्वरित नेत्यांसोबत चर्चा केली. सोनिया गांधी विदेशात असल्यामुळे नितीशकुमार आणि त्यांची चर्चा होऊ शकली नाही. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी नियमित तपासणीसाठी विदेशात गेलेल्या आहेत. याच काळात त्यांच्या आईचे निधन झाले. नितीशकुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर अन्य विरोधी पक्षांना सोनिया गांधी परतण्याची प्रतीक्षा आहे. जेणेकरून, पुढील रणनीती तयार करता येईल. त्या लवकरच परततील, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा