तिस्ता सेटलवाड यांच्या चौकशीसाठी समिती
By Admin | Updated: March 6, 2015 18:11 IST2015-03-06T18:11:35+5:302015-03-06T18:11:35+5:30
सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या चौकशीकरता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे.

तिस्ता सेटलवाड यांच्या चौकशीसाठी समिती
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या चौकशीकरता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ वकिल अभिजित भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली असून गुजरातमधील केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू एस.ए बारी व मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी गया प्रसाद यांची नेमणूक करण्यात आली आहे. अहमदाबाद येथील गुलबर्ग सोसायटीमधील संग्रहालयाच्या नावावर पैशांचा अपहार करण्यात आल्याचा आरोप तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी जावेद आनंद यांनी सबरंग ट्रस्टची आवश्यक ती कागदपत्रं सादर करत पोलिसांना सहकार्य करावे असा आदेश न्यायालयाने दिला आहे.