आयुक्तांची बिलोली तहसील कार्यालयात टेबल टु टेबल पाहणी

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:06+5:302015-03-20T22:40:06+5:30

बिलोली : धर्माबाद व बिलोली तालुक्याच्या दौर्‍यावर असलेल्या महसूल आयुक्त डॉ़उमाकांत दांगट यांनी गुरुवारी रात्री ९ वाजता बिलोली तहसील कार्यालयातील प्रत्येक विभागनिहाय टेबलची पाहणी केली़ जिल्हाधिकारी धिरजकुमार, उपजिल्हाधिकारी व्ही़एल़कोळी यांनी आयुक्तांना विभागनिहाय कामकाजाची माहिती दिली़

Commissioner of Table to table in Biloli tehsil office | आयुक्तांची बिलोली तहसील कार्यालयात टेबल टु टेबल पाहणी

आयुक्तांची बिलोली तहसील कार्यालयात टेबल टु टेबल पाहणी

लोली : धर्माबाद व बिलोली तालुक्याच्या दौर्‍यावर असलेल्या महसूल आयुक्त डॉ़उमाकांत दांगट यांनी गुरुवारी रात्री ९ वाजता बिलोली तहसील कार्यालयातील प्रत्येक विभागनिहाय टेबलची पाहणी केली़ जिल्हाधिकारी धिरजकुमार, उपजिल्हाधिकारी व्ही़एल़कोळी यांनी आयुक्तांना विभागनिहाय कामकाजाची माहिती दिली़
सगरोळी येथून जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ करून आयुक्त डॉ़उमाकांत दांगट बिलोली उपजिल्हा कार्यालयात आले़ रात्री ९च्या दरम्यान तालुक्यातील आढावा घेतला़ नव्याने दोन वर्षापूर्वी निर्माण झालेल्या उपजिल्हा कार्यालयातील मांडणी आणि विभागाची पाहणी केली़ तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार विभाग, निवडणूक विभाग, अभिलेख कक्ष आदींची प्रत्येक कक्षात पाहणी केली़ एकंदर तेलंगणा या नव्या राज्याच्या सीमेवर असलेल्या बिलोली संदर्भात सविस्तर माहिती घेतली़ यावेळी जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, तहसीलदार डॉ़भवानजी आगे पाटील, सर्व नायब तहसीलदारसह प्रत्येक विभागाचे कर्मचारी हजर होते़ बिलोली व कुंडलवाडी मुख्याधिकारी देखील हजर राहिले़ येथील मारोती मंदिर देवस्थानच्या कब्जेधारक शंभर जणांनी आयुक्तांना निवेदन दिले़ त्याचप्रमाणे दोन मालगुजारी तलावातील अतिक्रमणासंबंधी गावकर्‍यांच्या वतीने अर्जुन अंकोशकर, धोंडीबा शंखपाळे आदींनी निवेदन दिले़ आयुक्तांच्या समवेत म६सूल, शिक्षण, कृषीसह सर्व विभागाचा ताफा होता़

Web Title: Commissioner of Table to table in Biloli tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.