वाणिज्य - ६ बाय २
By Admin | Updated: April 10, 2015 23:30 IST2015-04-10T23:30:04+5:302015-04-10T23:30:04+5:30

वाणिज्य - ६ बाय २
>पी. पी. टॉवर हाऊसिंग सोसायटीची समिती गठितनागपूर : मानेवाडा चौक येथील पी. पी. टॉवर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची पहिली सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सभेत २०१५-१६ या वर्षासाठी हंगामी कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयातील सहायक अधिकारी अमित कस्तुरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी उल्हास दलाल, उपाध्यक्ष नरेंद्र कोल्हे, सचिव महेश नंदनपवार, कोषाध्यक्ष अंजु सिंगारे, कायदेविषयक सल्लागार संदीप आग्रे आणि सदस्यात नरेंद्र हरणे, कविता वाघ, दीपक देशपांडे, विलास गोरख, डॉ. राजेश सिंगारे, विरेंद्र डोंगरे यांचा समावेश आहे. सभेची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. बैठकीची कार्यवाही संयोजक प्रा. दिलीप सेनाड, मुख्य प्रवर्तक महेश नंदनपवार यांनी पार पाडली. अमित कस्तुरे यांनी कार्यकारिणीची घोषणा करून संस्था नोंदणीचे प्रमाणपत्र हस्तांतरित केले. संचालन शिल्प नंदनपवार यांनी केले. यशस्वीतेसाठी श्रावण वाघ, वैशाली डोंगरे, सचिन माळवी, दर्शन डोंगरे यांनी परिश्रम घेतले. (वाणिज्य प्रतिनिधी)