शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh Assembly Election 2022: मतदान करा अन् देशाला भयमुक्त करा; मतदानाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 10:13 IST

Uttar Pradesh Assembly Election 2022: आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून उत्तर प्रदेशातील 58 जागांसाठी मतदान होत आहे.

नवी दिल्ली:  देशात 5 राज्यांच्या निवडणुकांचा जोर पाहायला मिळत असून राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपांनी चांगलंच तापलं आहे. त्यात, आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून उत्तर प्रदेशातील 58 जागांसाठी मतदान होत आहे. त्यासाठी, 623 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात स्वत:ला सिद्ध करणार आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून थंडीचा जोर असतानाही मतदारराजा केंद्रांवर पोहचत आहे. याचपार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. 

मतदानाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मतदारांना आवाहन करणारे एक ट्वीट केले आहे. 'देशाला भयमुक्त करा, बाहेर या मतदान करा' असे आवाहन करणारे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. सर्व मतदारांना मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

मेरठ येथील 7 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून येथे 26 लाख मतदान आहे. मतदारांचा उत्साह सकाळपासून मतदान केंद्रावर पाहायला मिळत आहे. तर, पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला आहे. अनेक मतदारसंघातील केंद्रावर उमेदवार मंडळीही हजर झाली असून माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करुन नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे. दरम्यान, मतदान शांततेत सुरू असतानाच मथुरा आणि मुझफ्फरनगर येथील केंद्रावर ईव्हीएम बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. 

दरम्यान, सर्व मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली आहे. काही केंद्रावरुन मतदान यंत्रात बिघाड असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. आम्ही तेथील मतदान यंत्र बदलून देत अडचण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. सगळीकडे शांततेत मतदान सुरू आहे, असे शामली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी जसजीत कौर यांनी म्हटले आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 जागांसाठी मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रिया 7 टप्प्यात पार पडणार आहे. याातील पहिला टप्पा आज पार पडणार आहे. आज 58 जागांसाठी मतदान होणार आहे. मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासू सुरू होणार असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या भागात शेतकरी व जाट यांचे प्राबल्य आहे, त्यामुळे यावेळी शेतकरी आंदोलनामुळे येथील समीकरण गेल्या निवडणुकीपेक्षा काहीसे वेगळे मानले जात आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर या भागातील भाजपने 58 पैकी 53 जागा जिंकून भाजपने मोठी आघाडी घेतली होती. मात्र यावेळी ते तितकेसे सोपे मानले जात नाही.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा