शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जी-२० संमेलनासाठी वाहतूक पोलिसांची रंगीत तालीम; १० हजार पोलिस कर्मचारी करणार तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 07:48 IST

दिल्लीकरांच्या दैनंदिन जीवनावर फारसा परिणाम होणार नाही, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. 

- सुनील चावकेनवी दिल्ली : जी-२० देशांच्या शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी येत असलेल्या जगातील अतिमहत्त्वाच्या नेत्यांच्या वाहनांच्या ताफ्यांची शनिवारी दिल्लीच्या विविध रस्त्यांवर तसेच प्रगती मैदानाच्या भारत मंडपम येथे पूर्ण रंगीत तालीम घेण्यात आली. या संमेलनादरम्यान वाहतूक नियंत्रण करण्यासाठी दहा हजार पोलिस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे.

शनिवारी सकाळी ८:३० ते १२ वाजेपर्यंत, दुपारी ४:३० ते ६ वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ७ पासून रात्री ११ पर्यंत तीन टप्प्यांमध्ये रंगीत तालीम घेण्यात आली. सकाळी इंडिया गेटभोवतीचे सहा रस्ते, मथुरा रोड, भैरोमार्ग, रिंग रोड, जनपथ, कर्तव्यपथ, विवेकानंद मार्ग, बाराखंबा रोड, टॉलस्टॉय मार्ग, शांतीपथ, सत्य मार्ग, सरदार पटेल मार्ग, कौटिल्य मार्ग, पंचशील मार्ग या एनडीएमसी आणि नवी दिल्लीतील मार्गांवर रंगीत तालीम घेण्यात आली.

दिल्लीतील वास्तव्यादरम्यान अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांची सुरक्षित आणि निर्वेध वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी नवी दिल्ली आणि एनडीएमसी भागात सर्व प्रकारची वाहतूक नियंत्रणाखाली असेल. पण त्यामुळे दिल्लीकरांच्या दैनंदिन जीवनावर फारसा परिणाम होणार नाही, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. 

८ ते १० सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी

शिखर संमेलनादरम्यान नागरिकांनी शेजारच्या शहरांतून दिल्लीत येण्या-जाण्यासाठी गुगल आणि मॅप माय इंडियाची मदत घ्यावी, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे. जी-२० शिखर संमेलनासाठी ८ ते १० सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. या काळात केवळ भारत मंडपम म्हणजे प्रगती मैदानाशेजारचे सुप्रीम कोर्ट मेट्रो स्थानक बंद राहणार आहेत. शिखर संमेलनाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना मेट्रो रेल्वेने दिल्लीत कुठेही जाता येईल. पण अनेक प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक तसेच बस वाहतुकीसाठी मार्ग बदलण्यात आल्यामुळे वाहनांनी प्रवास करणे अवघड होणार आहे.

टॅग्स :Indiaभारतtraffic policeवाहतूक पोलीस