आपल्याच ज्युनिअरच्या पत्नीसोबत होतं कर्नलचं अफेअर, अर्ध्या रात्री रंगेहात पकडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 16:07 IST2017-11-02T15:22:14+5:302017-11-02T16:07:43+5:30
भारतीय लष्कराच्या एका कर्नलला आपल्याच ज्युनिअर ऑफिसरच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. पंजाबमधील भटिंडा येथील हे प्रकरण आहे.

आपल्याच ज्युनिअरच्या पत्नीसोबत होतं कर्नलचं अफेअर, अर्ध्या रात्री रंगेहात पकडलं
भटिंडा - भारतीय लष्कराच्या एका कर्नलला आपल्याच ज्यूनिअर ऑफिसरच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. पंजाबमधील भटिंडा येथील हे प्रकरण आहे. दोन्ही अधिकारी कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्सचे सदस्य आहेत. लष्कराने अधिका-याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. हिंदुस्तान टाइम्सने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मिलिटरी पोलिसांनी 26 ऑक्टोबरला रात्री तीन वाजता लेफ्टनंट कर्नलच्या घरावर छापा मारला. लेफ्टनंट कर्नलने आधीच पोलिसांना संपुर्ण माहिती दिलेली होती. लष्कराच्या कायद्यांतर्गत हा गंभीर गुन्हा मानला जातो. दोषी सिद्द झाल्यास नियमाप्रमाणे अधिका-याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. आरोपी कर्नल भटिंडा झोनचा अतिरिक्त मुख्य अभियंता आहे. ज्यावेळी सैन्य पोलिसांनी छापा मारला, तेव्हा लेफ्टनंट कर्नला एका गोल्ट टुर्नामेंटसाठी चंदिगडला गेला होता.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, कर्नल आणि लेफ्टनंट कर्नलच्या पत्नीला रंगेहात पकडल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यासाठी भटिंडाच्या लष्करी रुग्णालयात नेण्यात आलं. तपास पुर्ण होईपर्यंत कर्नलला दुस-या कार्यालयात शिफ्ट करण्यात येणार आहे. अधिका-यांमध्ये विवाहबाह्य संबंधाच्या घटना वाढत असून, लष्कर याप्रकरणी चिंतेत आहे. अशा प्रकरणी पकडण्यात आलेल्या अधिका-यांवर सक्त कारवाई करण्यावरही लष्कर विचार करत आहे.
एका लष्कर अधिका-याने सांगितल्यानुसार, 'अशा प्रकरणांमध्ये लष्कर कडक भूमिका घेतं. अधिका-यांची वर्तवणुक गुणवत्तेला धरुन असली पाहिजे'. काही आठवड्यांपुर्वी लष्कराने एका लेफ्टनंट कर्नलला आपल्याच सहका-याच्या मुलीसोबत अफेअर असल्याच्या कारणाने निलंबित केलं होतं.