शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शिमल्यात कर्नलने केला लेफ्टनंट कर्नलच्या मुलीवर बलात्कार, कर्नलला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 12:24 IST

सैन्यातील कर्नलने लेफ्टनंट कर्नलच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शिमल्यात घडली आहे.

ठळक मुद्दे सैन्यातील कर्नलने लेफ्टनंट कर्नलच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शिमल्यात घडली आहे. बुधवारी शिमला पोलिसांनी आरोपी कर्नलला अटक केली.

शिमला- सैन्यातील कर्नलने लेफ्टनंट कर्नलच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी शिमला पोलिसांनी आरोपी कर्नलला अटक केली. मुंबईत मॉडेलिंग क्षेत्रात काम मिळवून देण्याचं आमिष दाखवत कर्नलने पीडित मुलीला भेटायला बोलावलं आणि दारु पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. 

पीडित तरुणी 21 वर्षांची असून तिचे वडील शिमला येथील सैन्याच्या प्रशिक्षण केंद्रात लेफ्टनंट कर्नलपदावर कार्यरत आहेत. तर आरोपी कर्नलसुद्धा त्याच प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहे. 19 नोव्हेंबर रोजी कर्नलपदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने सहकारी लेफ्टनंट कर्नल आणि त्यांच्या मुलीला एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. तुमच्या मुलीला मॉडेलिंगसाठी मुंबईत पाठवा, माझ्या ओळखीने तिला काम मिळवून देऊ, असं त्याने लेफ्टनंट कर्नलला सांगितलं.

दुसऱ्या दिवशी आरोपी कर्नलने पीडित मुलीला व्हॉट्स अॅपवर तिचे फोटो पाठवायला सांगितले होते. मुंबईत राहणाऱ्या माझ्या मुलीला तुझे फोटो फॉरवर्ड करतो असं त्याने पीडित तरूणीला सांगितलं. फोटो पाठवल्यानंतर कर्नलने पीडितेला फोन केला आणि  घरी भेटायला बोलावलं. मॉडलिंग क्षेत्रातील काही प्रसिद्ध व्यक्तींशी ओळख करुन देतो, असं आरोपी कर्नलने पीडित तरूणीला सांगितलं. पीडित तरुणी कर्नलच्या घरी पोहोचल्यावर कर्नलने तिला दारु पाजून तिच्यावर बलात्कार केला. कर्नलसोबत आणखी एक व्यक्तीही घटनास्थळी उपस्थित होता, असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेबद्दल कुणालाही सांगितलं तर तुझ्या वडिलांचं करिअर उद्ध्वस्त करू, अशी धमकी कर्नलने दिल्याचा आरोप पीडित तरूणीने केला.

दरम्यान, या प्रकरणी मंगळवारी पीडित तरुणी आणि तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय तपासणी केली असून आरोपी कर्नलला अटक करण्यात आली आहे. तर कर्नलच्या साथीदाराचा शोध सुरु आहे. या गुन्ह्यातील कर्नलचा साथीदार कोण होता हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाPoliceपोलिसArrestअटक