शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोलवडीत तणाव

By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST

लोणीकंद : कोलवडी (ता. हवेली) येथील ज्येष्ठ नागरिक परमेश्वर बबन गायकवाड (वय ५७) यांच्या मृत्यूमुळे काल रात्रीपासून गावात तणावाचे वातावरण होते. अखेर पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी स्वत: चौकशीचे व दोषीवर कार्यवाही करण्याचे आस्वासन दिले. त्यानंतर आज दुपारी नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेऊन कोलवडी गावात त्यावर अंत्यसंस्कार केले.

लोणीकंद : कोलवडी (ता. हवेली) येथील ज्येष्ठ नागरिक परमेश्वर बबन गायकवाड (वय ५७) यांच्या मृत्यूमुळे काल रात्रीपासून गावात तणावाचे वातावरण होते. अखेर पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी स्वत: चौकशीचे व दोषीवर कार्यवाही करण्याचे आस्वासन दिले. त्यानंतर आज दुपारी नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेऊन कोलवडी गावात त्यावर अंत्यसंस्कार केले.
लोणीकंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी : कोलवडी (ता. हवेली) येथे वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण करण्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ३ आठवड्यांनी त्यातील एकाने रानमळ्यातील विहिरीत परमेश्वर बबन गायकवाड (वय ५७) यांनी आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. या आत्महत्येला संबंधित पोलीसच जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाइकांनी केली. यामुळे गावात दिवसभर तणावाचे वातावरण होते.
दरम्यान, या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद ही करण्यात आली आहे. २४ जुलैला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल एम. एल. अवघडे हे नवनाथ गायकवाड या व्यक्तीच्या नावाने कोर्टाचे वॉरंट बजावण्यासाठी कोलवडी येथे गायकवाडवस्तीवर गेले होते. या वेळी महेश अर्जुन पवार, परमेश्वर बबन गायकवाड व त्याचा मुलगा सतेज असे तिघे भेटले. या वेळी चौकशीदरम्यान गैरसमजातून बाचाबाची, भांडणे झाली. या तिघांनीही मारहाण केल्याचा आरोप करून अवघडे यांनी या तिघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणला व मारहाणीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोनच दिवसांत त्यांच्या सुनेने कॉन्स्टेबल एम. एल. वारघडे यांच्याविरोधात शिवीगाळ व विनयभंगाचा तक्रार अर्ज दिला होता.
दरम्यान, दोन्ही घटनांची चौकशी व कार्यवाही बाकी असताना सोमवारी परमेश्वर बबन गायकवाड घरातून निघून गेले. काल सकाळी १०च्या सुमारास त्यांचा मृतदेह रानमळ्याच्या विहिरीत आढळून आला.
याबाबत बाळासाहेब मुरलीधर गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. संबंधित पोलिसावर गुन्हा दाखल करीत नाही तोपर्यंत अंत्यविधीच न करण्याची भूमिका मृताच्या नातेवाइकांनी घेतली.
पोलीस अधीक्षक जय जाधव यांनी या प्रकरणी लक्ष घातले. पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी परिस्थिती हाताळली. उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली कडूसकर पुढील तपास करीत आहेत.
०००