कॉलेज तरुणांना लुटणारी टोळी गजाआड
By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:41+5:302015-08-03T22:26:41+5:30
उल्हासनगर : शहरातील रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवर चांदीबाई महाविद्यालयातील मानव हजरती, शिवम, हिमांशू हे ३ मित्र कॉलेजमध्ये जात असताना भरदुपारी एका टोळक्याने चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. पैसे न दिल्याने टोळक्याने मारहाण करून शिवम व हिमांशूकडील मोबाइल घेऊन पलायन केले. तरुणांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. चोरांच्या वर्णनानुसार पोलिसांनी संजू ऊर्फ बॉडीगार्ड चव्हाण, ख्वाजा शेख यांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. अटक आरोपींकडून हत्यारे व मोबाइल जप्त केले असून स्कायवॉक परिसरात पोलिसांचे पेट्रोलिंग वाढवून रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील बंद पडलेली पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनेसह स्थानिक नागरिकांकडून होत आहे. (प्रतिनिधी)

कॉलेज तरुणांना लुटणारी टोळी गजाआड
उ ्हासनगर : शहरातील रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवर चांदीबाई महाविद्यालयातील मानव हजरती, शिवम, हिमांशू हे ३ मित्र कॉलेजमध्ये जात असताना भरदुपारी एका टोळक्याने चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. पैसे न दिल्याने टोळक्याने मारहाण करून शिवम व हिमांशूकडील मोबाइल घेऊन पलायन केले. तरुणांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. चोरांच्या वर्णनानुसार पोलिसांनी संजू ऊर्फ बॉडीगार्ड चव्हाण, ख्वाजा शेख यांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. अटक आरोपींकडून हत्यारे व मोबाइल जप्त केले असून स्कायवॉक परिसरात पोलिसांचे पेट्रोलिंग वाढवून रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील बंद पडलेली पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनेसह स्थानिक नागरिकांकडून होत आहे. (प्रतिनिधी)