स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:48 IST2025-10-14T15:43:46+5:302025-10-14T15:48:32+5:30
Coldest Winter 2025: ला-निनामुळे यंदाचा हिवाळा देणार धक्का! मागील ११० वर्षांतील तिसरा सर्वात थंड ऋतू असण्याची शक्यता. उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट, वाचा सविस्तर अंदाज.

स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
देशभरात मुसळधार पावसाने कहर मांडलेला असतानाच आता कडाक्याची थंडी ती देखील गेल्या १०० वर्षांतील तिसरी सर्वात जास्त थंडीची लाट पसरणार आहे. स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट आदी देखील कमी पडतील एवढा गारवा पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यावर्षीचा हिवाळा हा मागील ११० वर्षांतील तिसरा सर्वात थंड हिवाळा असण्याची दाट शक्यता हवामानतज्ज्ञांनी दिला आहे.
प्रशांत महासागरातील 'ला-निना' या नैसर्गिक हवामान बदलाच्या पॅटर्नमुळे यंदा भारतात थंडीची लाट अधिक तीव्र आणि दीर्घकाळ टिकणारी असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ला-निना ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये प्रशांत महासागरातील पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा थंड होते. याचा परिणाम जागतिक हवामान प्रणालीवर होतो आणि भारतात अनेकदा यामुळे कडाक्याची थंडी पडते.
तीव्र थंडीची लाट: उत्तर आणि मध्य भारताच्या मैदानी प्रदेशात कडाक्याची थंडी वाढू शकते.
कालावधी: थंडीचा कालावधी सामान्य वर्षांच्या तुलनेत अधिक लांबण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात प्रभाव : दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांसह उत्तर भारताच्या अनेक भागांत तापमानात मोठी घट दिसून येईल.
हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, जर ला-निना पूर्णपणे विकसित झाला, तर तो हवामान बदलामुळे होणारा तापमानाचा वाढता परिणाम काही प्रमाणात कमी करेल आणि भारतात अनेक दशकांतील सर्वात तीव्र थंडी अनुभवायला मिळू शकते. यामुळे शेती आणि जनजीवनावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याने, नागरिकांना आणि प्रशासनाला या बदलांसाठी आतापासूनच तयारी करण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.