शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

बोनी कपूर यांच्या दोन्ही पत्नींच्या मृत्युमधील मनाला चटका लावणारा योगायोग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 7:58 PM

बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूर आणि दुसरी पत्नी श्रीदेवी यांच्या मृत्युमध्ये एक अजब आणि मनाला चटका लावणारा योगायोग दिसून आला आहे. 

मुंबई -  बॉलीवूडमधील महिला सुपरस्टार म्हणून कारकीर्द गाजवणाऱ्या श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईमध्ये आकस्मिक निधन झाले. श्रीदेवी यांचे निधन अनेकांना चटका लावून गेले आहे. दरम्यान, बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूर आणि दुसरी पत्नी श्रीदेवी यांच्या मृत्युमध्ये एक अजब आणि मनाला चटका लावणारा योगायोग दिसून आला आहे. बोनी कपूर यांची पहिली पत्नी आणि अभिनेता अर्जुन कपूर याची आई मोना शौरी-कपूर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले होते. तर बोनी कपूर यांची दुसरी पत्नी असलेल्या श्रीदेवी यांचे काल रात्री निधन झाले. दुर्दैवाची बाब म्हणजे मोना आणि श्रीदेवी यांच्या मृत्यूमध्ये एक विचित्र योगायोग दिसत आहे. मोना कपूर यांचे निधन त्यांचा मुलगा अर्जुन कपूर याच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच झाले होते. तर श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूर हिचा धडक हा पहिला चित्रपट काही महिन्यांनंतर प्रदर्शित होणार असून, त्याआधीच श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. अर्जुन कपूरचा इश्कजादे हा चित्रपट मे 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र दोन महिन्यांपूर्वीच मार्च 2012 मध्ये मोना कपूर यांचा मृत्यू झाला होता. तर जान्हवी कपूर हिचा पहिला चित्रपट जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे मात्र आपल्या मुलीचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच श्रीदेवींना मृत्यूने कवटाळले आहे.  श्रीदेवी यांचा जीवन प्रवास - 

श्रीदेवीचा जन्म तामिळनाडूतील शिवकाशी या ठिकाणी झाला. वडील पेशाने वकील होते. श्रीदेवी यांना एक सख्खी आणि दोन सावत्र बहिणी आहेत. ‘थुनीवावन’ हा बालकलाकार म्हणून पहिला सिनेमा होता. या सिनेमात मुरुगन ही देवाची भूमिका साकारली होती. ज्युली या हिंदी सिनेमातही श्रीदेवी यांची झलक दिसली होती. पण त्या या सिनेमात मुख्य भूमिकेत नव्हत्या. पण, 1983 मध्ये 'हिम्मतवाला' हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि श्रीदेवी स्टार झाल्या.  1996 मध्ये  निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर जुदाई चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. त्यानंतर 2012 साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये  पुनरागमन केले. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.  मॉम हा श्रीदेवी यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 

श्रीदेवी यांचे काही गाजलेले चित्रपट....जुली, सोलावा सावन, सदमा, हिम्मतवाला, जाग उठा इन्सान, अक्लमंद, इंकलाब, तोहफा, सरफ़रोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, नया कदम,मकसद, सुल्तान, आग और शोला, भगवान, आखरी रास्ता,जांबांज, वतन के रखवाले, जवाब हम देंगे, औलाद, नज़राना,कर्मा, हिम्मत और मेहनत, मिस्टर इंडिया, निगाहें, जोशीले ,गैर क़ानूनी,चालबाज,खुदा गवाह, लम्हे, हीर राँझा, चांदनी, रूप की रानी चोरों का राजा, चंद्रमुखी, चाँद का टुकड़ा,गुमराह,लाडला, आर्मी, जुदाई, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश. 

टॅग्स :Srideviश्रीदेवीbollywoodबॉलिवूडentertainmentकरमणूक