ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 17:30 IST2025-09-17T17:29:01+5:302025-09-17T17:30:07+5:30
कृष्णा यांनी आपल्या कुटुंबासोबत बिर्याणी प्लेटमध्ये वाढून खायला सुरुवात केली. थोडे खाल्ल्यानंतर त्यांचे लक्ष बिर्याणीत फिरणाऱ्या झुरळांकडे गेले.

ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
आजकाल हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधून मागवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये उंदीर, झुरळं, बेडूक किंवा किडे सापडण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. या वेळी चिकन बिर्याणीत झुरळ निघाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना तेलंगणाच्या खम्माम जिल्ह्यातील आहे. खम्माम येथील एका व्यक्तीने झोमॅटोवरून मागवलेल्या चिकन बिर्याणीमध्ये झुरळ आढळले. श्रीनगर कॉलनीमध्ये राहणाऱ्या मेडीसेट्टी कृष्णा यांनी झोमॅटोवरून ऑनलाइन स्पेशल चिकन बिर्याणीची ऑर्डर दिली होती. ही बिर्याणी त्यांना शहरातील कोणार्क रेस्टॉरंटमधून पाठवण्यात आली होती.
बिर्याणी खाताना दिसले झुरळ
कृष्णा यांनी आपल्या कुटुंबासोबत बिर्याणी प्लेटमध्ये वाढून खायला सुरुवात केली. थोडे खाल्ल्यानंतर त्यांचे लक्ष बिर्याणीत फिरणाऱ्या झुरळांकडे गेले. त्यानंतर त्यांनी झोमॅटोकडून चौकशी केली असता, त्यांना बिर्याणीचे पार्सल कोणार्क रेस्टॉरंटमधून आल्याचे समजले.
यानंतर मेडीसेट्टी कृष्णा यांनी थेट कोणार्क रेस्टॉरंटमध्ये जाऊन व्यवस्थापनाकडे याबद्दल तक्रार केली. मात्र, रेस्टॉरंट व्यवस्थापनाने, "आमच्याकडे खाद्यपदार्थ अतिशय स्वच्छ आणि चांगल्याप्रकारे बनवले जातात," असा दावा केला. त्यांनी कृष्णा यांना पैसे परत देण्याची तयारी दर्शवली.
हॉटेलचा हलगर्जीपणा!
या घटनेमुळे चिंतेत पडलेल्या कृष्णा यांनी, "जर झुरळ असलेली बिर्याणी खाल्ल्याने माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांची तब्येत बिघडली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?" असा प्रश्न विचारला. व्यवस्थापनाकडे तक्रार करूनही त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही आणि हलगर्जीपणा केला, असेही त्यांनी सांगितले.