COBRA कमांडोंनी अर्ध्या रस्त्यातून धरली घरची वाट
By Admin | Updated: February 7, 2017 10:19 IST2017-02-07T09:58:06+5:302017-02-07T10:19:05+5:30
श्रीनगरहून हे कमांडो सीआरपीएफच्या बिहार येथील मुख्यालयाकडे जात असताना अर्ध्यारस्त्यातून त्यांनी घरची वाट धरली.

COBRA कमांडोंनी अर्ध्या रस्त्यातून धरली घरची वाट
ऑनलाइन लोकमत
गया, दि. 7 - नव्याने सेवेत भरती झालेले 59 कमांडो कोणालाही न कळवता अचानक रजेवर गेल्याने देशातील सर्वात मोठया निमलष्करी दलाला धक्का बसला आहे. CRPF च्या विशेष कोब्रा युनिटचे हे कमांडो आहेत.
श्रीनगरहून हे कमांडो सीआरपीएफच्या बिहार येथील मुख्यालयाकडे जात असताना अर्ध्यारस्त्यातून त्यांनी घरची वाट धरली. रविवारी रात्री मुगलसराय रेल्वे स्थानकात ही घटना घडली. ट्रेनमध्ये सोबत असणा-या कमांडरला कोणतीही माहिती न देता हे कमांडो सरळ घरी निघून गेले.
सीआरपीएफने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. श्रीनगर येथे पाच दिवसांचे प्रशिक्षण आटोपून हे कमांडो बिहारला परतत होते. 7 फेब्रुवारीला त्यांनी डयुटीवर रुजू होणे अपेक्षित होते. बिहारमध्ये नक्षलप्रभावित भागांमध्ये या कमांडोंची तैनाती होणार होती.